जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 2 रुपयांचा शेअर पोहोचला 178 रुपयांवर, 1 लाखाचे झाले 73 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

2 रुपयांचा शेअर पोहोचला 178 रुपयांवर, 1 लाखाचे झाले 73 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

2 रुपयांचा शेअर पोहोचला 178 रुपयांवर, 1 लाखाचे झाले 73 लाख; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

Brightcom Group Share Price: हा शेअर 2021मधील मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहे. गेल्या 3 वर्षांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger Penny Stock) 2.44 रुपयांवरून 178.05 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना अंदाजे 7 हजार 200 टक्के वाढ दिली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 20 जानेवारी: शेअर बाजारात गुंतवणूक (Investment in Share Market) करायची असेल, किंवा नफा मिळवायचा असेल तर अधिक किंमतीचे, महागडे शेअर्स घ्यावे लागतात, त्यामुळे मोठी रक्कम गुंतवावी लागते असा अनेकांचा समज आहे. मात्र असे अजिबात नाही. अनेक अगदी किरकोळ किंमतीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करतात. अशा किरकोळ किंमतीच्या शेअर्सना पेनी स्टॉक (Penny Stocks) म्हणतात. गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देणारे शेअर्स मल्टीबॅगर शेअर्सच्या (Multibagger Shares) यादीत समाविष्ट होतात. 2021मध्ये अनेक पेनी स्टॉक्सनी चांगली कामगिरी केली आणि नव्या वर्षात 2022 च्या सुरुवातीलाही त्यांच्यातील तेजी कायम राहिली. त्यामुळं अनेक पेनी स्टॉक्सनी मल्टीबॅगर शेअर्सच्या यादीत स्थान मिळवलं. अशा काही पेनी स्टॉक्समध्ये ब्राईटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या (Brightcom Group Share Price) शेअरचा समावेश आहे. हा शेअर 2021मधील मल्टीबॅगर शेअर्सपैकी एक आहे. गेल्या 3 वर्षांत हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger Penny Stock) 2.44 रुपयांवरून 178.05 पर्यंत वाढला आहे. या कालावधीत या शेअरने गुंतवणूकदारांना अंदाजे 7 हजार 200 टक्के वाढ दिली. हे वाचा- Pension नियमात मोठा बदल, आता या तारखेला मिळणार निवृत्ती वेतन; वाचा सविस्तर गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर शेअर सुमारे 4.5 टक्क्यांच्या घसरणीसह विक्रीच्या दबावाखाली आहे. तर गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 35 रुपयांवरून 178 रुपयांपर्यंत वाढला असून, या कालावधीत त्यानं जवळपास 400 टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या एका वर्षात, हा शेअर 6.20 रुपयांवरून 178 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत सुमारे 2800 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या 3 वर्षांत, तो 2.44 रुपयांवरून 178 रुपयांपर्यंत वाढला आहे, या कालावधीत त्यानं तब्बल 7200 टक्के वाढ नोंदवली आहे. 1 लाख रुपयांचे झाले 73 लाख रुपये एखाद्या गुंतवणूकदाराने एका महिन्यापूर्वी ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आज 95 हजार 500 झाले असते, मात्र गेल्या सहा महिन्यांत त्याचे 5 लाख झाले असते. एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या मल्टीबॅगर पेनी स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असते तर आज त्याला 29 लाख रुपये मिळाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 73 लाख रुपये झाले असते. हे वाचा- Gold Price Today: सोनंचांदी महागली की आज उतरली झळाळी? इथे तपासा लेटेस्ट भाव आणखी वाढण्याची संधी; तज्ज्ञांचा अंदाज गेल्या महिन्याभरात या शेअरवर विक्रीचा दबाव असला तरी अद्याप यात वाढीची संधी असल्याचं शेअर बाजार विश्लेषकांचे (Share Market Analyst) म्हणणे आहे. पुढील दोन आठवड्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 200 रुपयांच्या पातळीवर जाईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात