मराठी बातम्या /बातम्या /मनी /Mutual Fund : SIP सुरु करण्याची योग्य तारीख कोणती? पेमेंट वेळेत न झाल्यास काय होतं?

Mutual Fund : SIP सुरु करण्याची योग्य तारीख कोणती? पेमेंट वेळेत न झाल्यास काय होतं?

SIP सुरू करताना एक विशेष गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे कोणत्या तारखेपासून सुरू करावी. तज्ञ म्हणतात की आपण कोणत्याही तारखेला प्रारंभ करू शकता, परंतु असे करणे केव्हा चांगले होईल हे समजून घेणे आवश्यक आहे.

SIP सुरू करताना एक विशेष गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे कोणत्या तारखेपासून सुरू करावी. तज्ञ म्हणतात की आपण कोणत्याही तारखेला प्रारंभ करू शकता, परंतु असे करणे केव्हा चांगले होईल हे समजून घेणे आवश्यक आहे.

SIP सुरू करताना एक विशेष गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे कोणत्या तारखेपासून सुरू करावी. तज्ञ म्हणतात की आपण कोणत्याही तारखेला प्रारंभ करू शकता, परंतु असे करणे केव्हा चांगले होईल हे समजून घेणे आवश्यक आहे.

मुंबई, 18 डिसेंबर : SIP मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे पद्धतशीर गुंतवणूक योजना (Investment Plan) हा एक शहाणपणाचा निर्णय आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी तुम्ही त्याबद्दल माहिती घेणे गरजेचं आहे. एसआयपी सुरू करताना एक विशेष गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे कोणत्या तारखेपासून सुरू करावी. तज्ञ म्हणतात की आपण कोणत्याही तारखेला प्रारंभ करू शकता, परंतु असे करणे केव्हा चांगले होईल हे समजून घेणे आवश्यक आहे.

SIP सुरू करण्यासाठी योग्य तारीख

झी बिझनेसने दिल्ला वृत्तानुसार, एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी योग्य तारीख निवडण्यासाठी कोणतेही विशिष्ट सूत्र नसले तरी, एचडीएफसी बँकेच्या मते, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेनंतरची तारीख निवडण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही. सामान्यतः, गुंतवणूकदार एसआयपीशी लिंक केलेल्या बँक खात्यात पैसे उपलब्ध असल्याची माहिती असलेल्या तारखेनुसार एसआयपीची तारीख ठरवतात. एसआयपी सुरू करण्यापूर्वी तुम्ही एसआयपी कॅल्क्युलेटर वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला रिटर्नची कल्पना येईल.

Multibagger Stock : 'या' स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना बंपर कमाई; 2 रुपयांचा स्टॉक 195 रुपयांवर

SIP म्हणजे काय

SIP (Sysatematic Investment Plan) किंवा एक पद्धतशीर गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही ठराविक अंतराने पूर्व-निर्धारित म्युच्युअल फंड योजनेत निश्चित रक्कम गुंतवता. एकतर मासिक किंवा त्रैमासिक आधारावर विशिष्ट गुंतवणूक असते. एसआयपी संपूर्ण गुंतवणुकीच्या तुलनेत तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या खर्चाची सरासरी काढते. हे तुम्हाला तुमच्या आर्थिक मर्यादेनुसार तुमची गुंतवणूक योजना निवडण्याची (How do choose the right date for SIP) सुविधा देते.

Star Health Insurance IPO मध्ये गुंतवणूकदारांचं 10 टक्के नुकसान, मात्र राकेश झुनझुनवालांनी कमावले 5418 कोटी

पेमेंट तारीख चुकल्यास काय?

प्रत्येक एसआयपीमध्ये ऑटो डेबिट ट्रान्जॅक्शन फीचर असते, त्यामुळे पैसे लिंक बँक खात्यातून देय तारखेला आपोआप जमा होतात. पण खात्यात शिल्लक नसल्यामुळे एसआयपीमधील पैसे नियोजित तारखेला जमा केले नाहीत, तर बँका तुमच्याकडून शुल्क आकारतात. म्हणून, देय तारखेला तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक असल्याची खात्री करा.

First published:
top videos

    Tags: Investment, Mutual Funds