नवी दिल्ली, 29 जानेवारी : पोस्टात खातं असणाऱ्या खातेधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण टपाल विभागानं खातेधारकांना आपलं मॅग्नेटिक एटीएम कार्ड (ATM) बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. नवं चीप आधारित कार्ड (Chip based card) त्याऐवजी देण्यात येत आहे. तसंच, आपला मोबाईल क्रमांक अपडेट करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली असून खातेधारकांकडे केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. दोन दिवसात तुम्ही इंडिया पोस्टच्या सूचनांचं पालन करत प्रक्रिया पूर्ण केली नाही तर, 1 फेब्रुवारीपासून तुमचं मॅग्नेटिक एटीएम कार्ड (Magnetic ATM card) बंद होईल. डाक विभागाच्या बचत खातेधारकांना आपल्या होम ब्रँचमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मैग्नेटिक कार्ड बंद करण्याच्या निर्देश मैग्नेटिक कार्डपेक्षा EMV chip आधारित एटीएम कार्ड अधिक सुरक्षित असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचं (RBI) म्हणणं आहे. रिझर्व बँकेच्या (RBI) निर्देशानंतर जवळपास सर्वच बँकांनी 2019च्या वर्षअखेरपर्यंत ग्राहकांचे मॅग्नेटिक कार्ड, EMV ATM कार्डमध्ये रुपांतरित केले. बचत खात्याची सुविधा डाक विभाग आपल्या ग्राहकांना बचत बँक खात्याची सुविधा देते. या खातेधारकांना खात्यातील रक्कमेवर दरवर्षी 4 टक्के व्याज दिलं जातं. 500 रुपये जमा करून हे खातं ग्राहकांना उघडता येतं. या खात्यासोबत ग्राहकांना चेकबुक आणि एटीएमची सुविधाही दिली जाते. चेकबुक सुविधाचा वापर खातेधारकांना करायचा नसेल तर 20 रुपये जमा करूनही खातं उघडता येतं. पोस्ट ऑफिसचे बचत खातेधारक एटीएममधून एक दिवसात 25 हजार रुपये काढू शकतात. – अन्य बातम्या
SBIच्या ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासाठी डेडलाईन
डिजिटल ट्रान्झेक्शन्सवर एक्स्ट्रा चार्जेस, पेटीएम म्हणते…
विकेंण्डला बँकेचा संप, ATMमध्ये खडखडाट होण्याची शक्यता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.