लॉकडाऊनमध्ये 1 लाख लीटर बिअर वाया, कंपन्यांना घ्यावा लागला नाल्यात फेकण्याचा निर्णय

लॉकडाऊनमध्ये 1 लाख लीटर बिअर वाया, कंपन्यांना घ्यावा लागला नाल्यात फेकण्याचा निर्णय

दिल्ली-एनसीआर मधून अशी बातमी समोर येत आहे की, याठिकाणच्या काही Breweries नी त्यांच्याइथे तयार होणारी बिअर नाईलाजास्तव नाल्यांमध्ये फेकून दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 एप्रिल : देशामध्ये लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू आहे. परिणामी 3 मेपर्यंत अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असून गरजेच्या नसणाऱ्या वस्तूंचा पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या तळीरामांना दारू मिळेनासे झाले आहे. या कारणामुळे दारूचा काळाबाजार वाढला असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मात्र आता दिल्ली-एनसीआर मधून अशी बातमी समोर येत आहे की, याठिकाणच्या काही Breweries नी त्यांच्याइथे तयार होणारी बिअर नाईलाजास्तव नाल्यांमध्ये फेकून दिली आहे.

(हे वाचा-संकटकाळात कामी येईल तुमचं ATM, मोदी सरकार देतंय या सुविधा मोफत)

दिल्ली-एनसीआरमधील कंपन्यांनी 1 लाख लीटर फ्रेश बिअर नाल्यांमध्ये फेकून दिल्याची माहिती समोर येत आहे. या कंपन्यांनी ही फ्रेश बिअर त्यांच्या प्लँटमध्ये ठेवली होती, मात्र बॉटलमध्ये अद्याप भरण्यात आली नव्हती. फ्रेश बिअर लवकर खराब होते मात्र ती खराब होऊ नये याकरता कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेचा खर्च या बिअरच्या किंमतीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे नाईलाजास्तव या कंपन्यांना बिअर फेकून द्यावी लागली आहे.

(हे वाचा-सलग 3 दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याचे भाव वधारले, जाणून घ्या बुधवारचे दर)

सीलबंद असणाऱ्या बिअरची सेल्फ लाइफ फ्रेश बिअरपेक्षा जास्त असते. परिणामी लॉकडाऊमध्ये 50 छोट्या Breweries ना 1 लाख लीटर फ्रेश बिअर फेकून द्यावी लागली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार बिअर फ्रेश ठेवण्यासाठी प्लँटमध्ये एक निश्चित तापमान ठेवावे लागते. त्याचप्रमाणे दररोज त्याचं मॉनिटरिंग देखील करावं लागते. सामान्य दिवशी बिअरचा असा स्टॉक शिल्लक राहातच नाही. लॉकडाऊनआधी बिअर प्लँट्समध्ये पूर्ण क्षमतेने काम सुरू होतं. मात्र आता या कंपन्यांना लॉकडाऊननंतर सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कारण लॉकडाऊन संपल्यानंतर सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळण्याकरता लोकं बिअर दुकानांपर्यंत येतील की नाही असा प्रश्न या कंपन्यांसमोर आहे.

(हे वाचा-Jio मध्ये Facebook सर्वात मोठा भागीदार, वाचा या करारातील 8 महत्त्वाच्या गोष्टी)

परदेशांतील काही ठिकाणांप्रमाणे भारतातही बिअरची होम डिलिव्हरी देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बिअर कंपन्यांनी सरकारकडे केली होती. मात्र ती मागणी नाकारण्यात आली आहे.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: April 22, 2020, 3:09 PM IST

ताज्या बातम्या