जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Brand Facts : वोडाफोनचा लोकप्रिय Dog गेला कुठे? अचानक गायब होण्यामागे हे कारण

Brand Facts : वोडाफोनचा लोकप्रिय Dog गेला कुठे? अचानक गायब होण्यामागे हे कारण

कुठे गायब झाला वोडाफोनचा पग?

कुठे गायब झाला वोडाफोनचा पग?

Brand Facts in Marathi : अचानक गेल्या काही वर्षांत वोडाफोनचा हा कुत्रा नक्की गेला कुठे? त्याच्या गायब होण्यामागे नेमकं काय कारण आणि ही संकल्पना नक्की भारतात आली कशी या सगळ्याबद्दल आज जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : वोडफोन कंपनीने आज आयडिया आणि वोडाफोनचं मर्जर केलं आहे. त्याआधी मात्र वोडाफोन नेटवर्कसोबतच कंपनीने केलेल्या जाहिरातींमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. आजही वोडाफोनच्या पगची जाहिरात जगभरात प्रसिद्ध आहे. ही जाहिरात दिसायची बंद झाली मात्र या कुत्र्याला नाव मात्र वोडाफोनचा कुत्रा असंच मिळालं. आजही पगला पग कमी आणि त्यापेक्षा जास्त भारतात वोडाफोनचा कुत्रा म्हणून जास्त ओळखलं जातं. मात्र गेल्या काही वर्षात हा कुत्रा अचानक जाहिरातींमधून गायब झाला. एकेकाळी हा कुत्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. ही युनिक आयडिया भारतात खूप लोकप्रिय झालीही ठरली. अचानक गेल्या काही वर्षांत वोडाफोनचा हा कुत्रा नक्की गेला कुठे? त्याच्या गायब होण्यामागे नेमकं काय कारण आणि ही संकल्पना नक्की भारतात आली कशी या सगळ्याबद्दल आज जाणून घेऊया.

Vodafone-Idea ग्राहकांची चिंता वाढली, पैसे न भरल्यास नोव्हेंबरपासून बंद होऊ शकते सेवा

भारतात ज्याला वोडाफोनचा कुत्रा म्हणून ओळखलं जातं तो खरंतर पग आहे. पग ही एक प्रकारची कुत्र्याची प्रजाती आहे. त्याचं नाव चिका त्याला चिका डॉग असंही म्हणतात. मूळचा चीनमधून आलेला हा कुत्रा खूप जास्त कुटुंबाशी जुळवून घेणारा असतो. त्यामुळे त्याला फॅमिलियर डॉग म्हटलं जातं. मालकाशीच नाही तर त्याच्या कुटुंबासोबत त्याचं एक छान नातं असतं.

News18लोकमत
News18लोकमत

2003 मध्ये टेलिकॉम कंपनी वोडाफोनला जाहिरात करण्यासाठी एक आयडिया हवी होती. त्यावेळी भाऊ बहिणीच्या नात्यावर जाहिरात करावी का असा विचार झाला. मात्र ही कल्पना काही केल्या टीम हेडला मान्य करायला तयार नव्हते. अशी काहीतरी गोष्ट जी सतत जोडलेली राहील मग त्यांना एक कल्पना सुचली, जसा कुत्रा आपल्या मालकासोबत इमानदार राहतो, तो नेहमी मालकासोबत असतो मग तसंच वोडाफोनचं नेटवर्कही ग्राहकांच्या सोबत कायम राहील. त्यामुळे ही भन्नाट आणि आगळीवेगळी कल्पना हिट झाली. ज्यात त्यांनी पग कुत्र्याला घेऊन वेगवेगळ्या जाहिराती केल्या. ज्या प्रमाणे प्रत्येकवेळी वस्तू विसरल्यानंतर कुत्रा ती आपल्या मालकाला आणून देतो असा आशय घेऊन केलेल्या जाहिराती हिट ठरल्या.

Recharge Plan change : या कंपनीचं कार्ड तुम्ही वापरता का? कंपनीकडून Recharge Plan मध्ये मोठे बदल

या जाहिरातीतून त्यांना सांगायचं होतं की तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तुमच्या मागे आमचं वोडाफोनचं नेटवर्क येईल ही कल्पना पग कुत्र्यामुळे हिट ठरली आणि त्यामुळे वोडाफोन भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. या जाहिरातीनंतर भारतात पग कुत्र्याची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली. मात्र अचानक हा कुत्रा आता जाहिरातीमधून कुठे गायब झाला असा प्रश्न समोर आला आहे. साधारण 2018 मध्ये वोडाफोन कंपनीने 30 पग कुत्र्यांना घेऊन जाहिरात केली. त्यानंतर पेटाने त्यांना जाहिरातीमध्ये कुत्रा वापरू नये असं आवाहन केलं. त्यांनी वोडाफोनच्या कुत्रा असलेल्या जाहिरातीवर आक्षेप घेतला. कोणत्याही प्राण्याला प्रोडक्ट विकण्यासाठी जोरात म्युझिक, सतत रिटेक, गोंधळात ठेवू नये. ते नियमांच्या विरोधात आहे. त्यावरून वोडाफोन आणि पेटा यांच्यातील वाद खूप चर्चेत राहिला होता.

Airtel Vs Vodafone Idea: Recharge करताय? जरा थांबा. कोणत्या कंपनीचे Plans किती झाले महाग? वाचा
जाहिरात

पेटाने आक्षेप घेतल्यानंतर बराच वेळ हे प्रकरण चर्चेत राहिलं आणि अखेर वोडाफोनने पग कुत्र्याला आपल्या जाहिरातीमध्ये न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पग जाहिरातीमधून कायमचा गायब झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात