जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Recharge Plan change : या कंपनीचं कार्ड तुम्ही वापरता का? कंपनीकडून Recharge Plan मध्ये मोठे बदल

Recharge Plan change : या कंपनीचं कार्ड तुम्ही वापरता का? कंपनीकडून Recharge Plan मध्ये मोठे बदल

Recharge

Recharge

Recharge Plan change : प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीचा ग्राहकांना मोठा धक्का, कंपनीकडून प्लॅनमध्ये मोठे बदल, खिशावर होणार मोठा परिणाम

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : आधीच महागाईच्या झळा जास्त बसत असताना आता टेलिकॉम कंपनीने एक मोठा बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. टेलिकॉम कंपनीने व्हॅलिटिचं लिमिट कमी केलं आहे. याचा परिणाम ग्राहकांना एकदा नाही तर महिन्यातून दोन वेळा मारावा लागू शकतो हे देखील तेवढंच खरं आहे. Vodafone Idea कंपनीने 99 आणि 128 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली. कंपनीने प्रत्येक ग्राहकामागचा (ARPU) वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. Vi गेल्या काही काळापासून ARPU वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विडाफोन आयडियाचा कॉर्टर 4 मधील परफॉरमन्स पाहता शेअर मार्केटमध्ये तो मागील तिमाहीत 135 रुपयांवर राहिला.

Vodafone Idea ने लॉन्च केले जबरदस्त Prepaid Plans, ग्राहकांना मोफत मिळणार Disney+ Hotstar आणि बरंच काही…

Vi साठी हे चांगलं नव्हतं, यामुळे बाजारातून पैसे उभे राहाणं आणखीन कठीण होत चाललं आहे. ग्राहकांना कितीही त्रास सहन करावा लागत असला तरी 99 रुपये आणि 128 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता कमी केल्याने Vi ला खूप मदत होणार आहे. Vi चे रिचार्ज खूप महाग आहेत. त्यामुळे छोटे प्लॅन घेण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. 99 रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करणार्‍या प्रत्येकाला आता अधिक वेळा रिचार्ज करावे लागेल. 99 रुपये आणि 128 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता कशी असणार ते समजून घेऊया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे बदल फक्त मुंबईतील टेलिकॉम सर्कलमध्ये लागू करण्यात आले आहेत.

Jio, Airtel आणि Vi च्या खास ऑफर्स, एकाच रिचार्जवर मिळणार डबल बेनिफिट
News18लोकमत
News18लोकमत

99 रुपयांच्या प्लॅनची वैधता आता 28 दिवसांवरुन कमी करण्यात आली असून ती 15 दिवस करण्यात आली आहे. प्लॅनची एक दिवसाची किंमत 3.53 रुपये होती आता ती वाढवून 6.6 करण्यात आली आहे. या प्लॅनची बेनिफिट्स पहिल्यासारखेच राहातील फक्त वैधता कमी करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 200 MB डेटा, 99 रुपयांचा टॉकटाइम आणि SMS ची सुविधा देण्यात आली आहे. Vodafone Idea 128 मुंबईतील 128 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांवरून 18 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. म्हणजेच या प्लॅनची ​​एका दिवसाची किंमत 4.57 रुपयांवरून 7.11 रुपये झाली आहे. वापरकर्त्यांना 10 लोकल ऑन-नेट नाईट मिनिटे + सर्व स्थानिक/राष्ट्रीय कॉल 2.5p/sec वर मिळतात. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत रात्रीच्या मिनिटांचा लाभ मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात