Home /News /technology /

Airtel Vs Vodafone Idea: Recharge करताय? जरा थांबा. कोणत्या कंपनीचे Plans किती झाले महाग? वाचा

Airtel Vs Vodafone Idea: Recharge करताय? जरा थांबा. कोणत्या कंपनीचे Plans किती झाले महाग? वाचा

airtel VI

airtel VI

व्होडाफोनचे प्रीपेड प्लॅन्स 25 नोव्हेंबरपासून महाग झाले आहेत, तर एअरटेलचे नवीन दर 26 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.

    मुंबई, 30 नोव्हेंबर:  एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन-आयडिया (Vodafone Idea) या भारतातल्या दोन आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी (Telecom companies) आपल्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या (Prepaid plans) किमती 20 ते 25 रुपयांनी वाढवल्या आहेत. व्होडाफोनचे प्रीपेड प्लॅन्स 25 नोव्हेंबरपासून महाग झाले आहेत, तर एअरटेलचे नवीन दर 26 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. या दोन्ही कंपन्यांचा सर्वांत स्वस्त प्लॅन 79 रुपयांपासून सुरू होत होता. दर वाढवल्यानं आता हा सर्वांत स्वस्त प्लॅन 99 रुपयांना उपलब्ध आहे. एअरटेलच्या या 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 200 MB डेटा आणि 1 पैसा प्रति सेकंद व्हॉइस टॅरिफ आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे काही प्रमुख प्रीपेड प्लॅन्स खाली देण्यात आले आहेत. एअरटेल Vs व्होडाफोन-आयडियाचा 249 रुपयांचा प्लॅन 249 रुपयांना मिळणारा व्होडाफोन आयडियाचा प्लॅन सर्वाधिक वापरला जातो. 28 दिवसांचा कालावधी असलेल्या या रिचार्जमध्ये (Recharge) दररोज 1.5 GB डेटा मिळतो. आता हा रिचार्ज प्लॅन 299 रुपयांना झाला आहे. याशिवाय व्होडाफोन आता 1GB डेटा पॅकसाठी (Data Pack) 219 रुपयांऐवजी 269 रुपये आकारणार आहे. कंपनीने 28 दिवसांच्या कालावधीसाठी मिळणाऱ्या 299 रुपयांच्या (दररोज 2GB डेटा) रिचार्ज प्लॅनची किंमत 359 रुपयांपर्यंत वाढवली आहे. 48MP ड्युअल कॅमेरा सेटअपसह Samsung चा नवा बजेट स्मार्टफोन, पाहा काय आहेत फीचर्स एअरटेलनंदेखील आपल्या 249 रुपयांच्या प्लॅनची किंमत 299 रुपयांपर्यंत वाढवली आहे. एअरटेलने 149 रुपयांच्या प्लॅनची किंमत 179 रुपयांपर्यंत वाढवली आहे, तर 219 रुपयांच्या प्लॅनची किंमत 265 रुपये करण्यात आली आहे. हे प्लॅन्सदेखील झाले महाग - 84 दिवसांच्या वैधतेसह मिळणाऱ्या एअरटेल प्रीपेड प्लॅनची किंमत आता किमान 455 रुपये असणार आहे. 598 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 719 रुपये आणि 698 रुपयांच्या प्लॅनची किंमत 839 रुपये करण्यात आली आहे. दुसरीकडे, 699 रुपयांना मिळणाऱ्या व्होडाफोन-आयडियाच्या 84 दिवसांच्या पॅकसाठी आता 839 रुपये मोजावे लागणार आहेत. या पॅकमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. 84 दिवसांसाठी दररोज 1.5GB डेटा मिळणाऱ्या पॅकची किंमत 599 रुपयांवरून 719 रुपयांपर्यंत वाढली आहे. व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलपाठोपाठ रिलायन्स जिओनेदेखील (Reliance Jio) आपल्या प्रीपेड प्लॅन्सची किंमत वाढवल्याची बातमी समोर आली आहे. जिओचे नवीन दर 1 डिसेंबरपासून लागू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. नवीन टॅरिफ प्लॅननुसार ही दरवाढ करण्यात आली आहे.
    First published:

    Tags: Airtel, Technology, Vodafone, Vodafone idea tariff plan

    पुढील बातम्या