मुंबई, 10 एप्रिल : सामान्य माणसाला किंवा नोकरदार व्यक्तीला आयुष्यात अनेकदा मोठ्या पैशांची गरज भासते किंवा आर्थिक संकट येतात. अशा परिस्थितीत कर्ज (Loan) हा पर्याय म्हणून प्रथम समोर येतो. विशेषतः कोरोनानंतर अनेकांना आर्थिक संकटातून जावे लागले आहे. अशा स्थितीत कर्ज घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या काळात सोन्यावरील कर्जाच्या (Gold Loan) वैशिष्ट्यांमुळे त्याची मागणीही झपाट्याने वाढली आहे. पर्सनल लोनपेक्षा (Personal Loan) गोल्ड लोन कोणत्या कारणांमुळे अधिक चांगले मानले जाऊ शकते याबद्दल माहिती घेऊया.
काय जास्त किचकट?
तुम्ही वैयक्तिक कर्ज (Peronal Loan) घेत असाल तर तुम्हाला काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. त्याच वेळी, सोन्यावरील कर्जाच्या बाबतीत, सोन्याची होल्डिंग तारण म्हणून राहते. म्हणजेच सोने तारण ठेवण्याच्या बदल्यात तुम्हाला कर्ज मिळत आहे. पर्सनल लोनमध्ये तुम्हाला बरीच कागदपत्रे द्यावी लागतात. उत्पन्नाचा दाखला, अधिवासाचा पुरावा आणि इतर तत्सम पुरावे. त्याच वेळी, हा सर्व त्रास सोन्यावरील कर्जामध्ये नाही.
ICICI बँकेचा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा, सीनियर सिटीजन स्पेशल एफडी स्कीमला मुदतवाढ; कधीपर्यंत मिळणार फायदा?
प्रक्रिया शुल्क (Processing fee)
वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत, बँकांना कोणतीही सुरक्षा दिली जात नाही. कर्जदाराचे उत्पन्न पडताळणीचे कागद तपासले जातात. परिणामी, बँका वैयक्तिक कर्जासाठी प्रक्रिया शुल्क आकारतात. ते 0.5 टक्के ते 1 टक्के असू शकते. तर, सोन्यावरील कर्जाच्या बाबतीत, कर्जदारांना अर्ज करताना उत्पन्नाचा पुरावा कागदपत्रे दाखवण्याची आवश्यकता नाही. ते त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचा वापर सुरक्षितता म्हणून करतात. त्यामुळे कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही.
गोल्ड लोनची प्रक्रिया सोपी
वैयक्तिक कर्ज घेताना उत्पन्नाच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रे द्यावी लागतात. त्यामुळे त्याची प्रक्रिया दीर्घ आणि वेळखाऊ आहे. त्याच वेळी, सोन्यावरल कर्जाची प्रक्रिया सरळ आहे. कर्जदार अनेक फॉर्मवर स्वाक्षरी करतात आणि त्यांच्या सोन्याच्या मौल्यवान वस्तू सुरक्षा म्हणून सादर करतात. त्यानंतर कर्जाची रक्कम मंजूर केली जाते.
इन्फोसिसच्या नारायण मूर्तींची मुलगी अक्षता ब्रिटनच्या राणीपेक्षाही श्रीमंत! कसे ते जाणून घ्या?
रीपेमेंट (Repayment)
वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत सोन्यावरील कर्ज रीपेमेंट पर्याय अधिक लवचिक आहेत. सोने कर्ज घेणारे कर्ज परतफेडीच्या विविध पद्धतींमधून निवडू शकतात. गोल्ड लोन तुमची रीपेमेंट करण्याची क्षमता वाढवण्यासाठी अनेक उपाय देतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कर्जाची परतफेड करण्याची उत्तम संधी मिळते.
व्याज दर
वैयक्तिक कर्जावरील व्याजदर सोन्यावरील कर्जाच्या तुलनेत खूप जास्त आहे. कारण यामध्ये गोल्ड लोन सुरक्षित कर्ज आहे आणि वैयक्तिक कर्ज असुरक्षित आहे. या दोन प्रकारच्या कर्जांपैकी उच्च आणि कमी व्याजदरांमधील फरक हा सर्वात महत्त्वाचा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.