नवी दिल्ली, 12 जुलै : इंस्टाग्रामवर लोक दिवसातील अनेक तास घालवतात. इंस्टाग्रामवरील रिल्स पाहण्यातही तास दोन तास कसे निघून जात हे देकील कळत नाही. आता इंटरटेनमेंटसोबतच इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान जेवणही ऑर्डर करु शकता. कारण आता तुम्ही इंस्टाग्राम रिल्स पाहता-पाहताच ट्रेनमध्ये जेवणही ऑर्डर करु शकता. ते देखील तुमच्या आवडत्या रेस्टॉरेंटमधून. ऑर्डर केल्यास्चाय काही वेळानंतर तुमच्या बर्थवर तुमच्या आवडीची डिश पोहोचले. हे शक्य झालं आहे कारण ऑनलाइन फूड एग्रीगेटर झूपने आपल्या सेवा इंस्टाग्रामवर सुरु केल्या आहेत. झूप हे आयआरसीटीसी मान्यताप्राप्त फूड एग्रीगेटर आहे.
इंस्टाग्राम झूपची सेवा सुरू केल्याने, झोमॅटो आणि स्विगी सारख्या फूड एग्रीगेटरला आव्हान मिळेल. झूपच्या इंस्टाग्राम चॅटबॉट सर्व्हिसचं नाव जीवा आहे आणि त्याचा वापर करून रेल्वे प्रवासी जेवण ऑर्डर करू शकतात. प्रवासी इंस्टाग्रामवरून ऑर्डर करू शकतात आणि उत्तर भारतीय आणि जैन खाद्यपदार्थ तसेच दक्षिण भारतीय, चायनीज खाद्यपदार्थ आणि स्नॅक्ससह विविध स्थानिक पदार्थांची ऑर्डर देऊ शकतात. सध्या, झूप भारतातील 150 हून अधिक रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना त्यांच्या जागेवर चांगल्या दर्जाचे आणि आरोग्यदायी अन्न पुरवत आहे. 2024 पर्यंत संपूर्ण भारतातील 250 हून अधिक रेल्वे स्टेशनवर सेवा पुरवण्याचे झूपचे उद्दिष्ट आहे. Indian Railway : रोज रात्री 45 मिनिटांसाठी बंद होते तिकीट बुकिंग, अवश्य जाणून घ्या वेळ इंस्टाग्रामवर Zoop द्वारे जेवण कसं ऑर्डर करावं -प्रथम Instagram अॅप उघडा आणि @zoopFood वर जा. -डायरेक्ट मेसेज (DM) द्वारे ऑटोमेटेड चॅटबॉट Ziva शी कनेक्ट होण्यासाठी Hi पाठवा. -यानंतर चॅटबॉट ऑप्शनमध्ये ‘Order Food’ हा ऑप्शन सिलेक्ट करा. -एक ऑप्शन निवडा किंवा चॅटबॉटच्या दिलेल्या ऑप्शनमधून फूड ऑर्डर करा. -फूड ऑर्डर आणि पुष्टीकरणासाठी Zoop टीम तुमच्याशी +91-7042062070 वर WhatsApp वर संपर्क करेल. -WhatsApp वर PNR शेअर करा आणि ऑर्डरसाठी डिलिव्हरी स्टेशन निवडा. -यामध्ये तुम्ही तुमचे आवडते रेस्टॉरंट आणि डिश निवडू शकता. -ऑर्डरची कंफर्म करण्यासाठी तुमचा आवडीटा पेमेंट मोड सिलेक्ट करुन पैसे द्या. -तुम्ही Instagram द्वारे ऑर्डर देखील ट्रॅक करू शकता आणि तुम्हाला हे जेवण तुमच्या सीटवर मिळेल.