Home /News /money /

पैसे नसतानाही रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बूक करा, Paytm ची नवी सेवा; चेक करा प्रोसेस

पैसे नसतानाही रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बूक करा, Paytm ची नवी सेवा; चेक करा प्रोसेस

पेटीएम पेमेंट गेटवे यूजर्स आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पेटीएम पोस्टपेड लाँच करून आयआरसीटीसी तिकीट सेवेवर 'Book Now Pay Later'चा फायदा घेऊ शकतात. पेटीएम पोस्टपेड यूजर्सना नंतर पैसे देण्याच्या पर्यायासह त्यांची तिकिटे IRCTC द्वारे बुक करण्याची परवानगी देते.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 एप्रिल : Paytm कंपनीच्या शेअरमध्ये पडझड होत असताना कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठं नुकसान होत आहे. मात्र दुसरीकडे Paytm आपल्या ग्राहकांना नवनवीन सेवा देत आहे. यामुळेच पेटीएम एक लोकप्रिय ई-वॉलेट आहे. आता पेटीएम आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा सुरू करणार आहे. पेटीएम युजर्सना रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागणार नाहीत. कोणतेही पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करणे आता शक्य होणार आहे. पेटीएम गेटवे युजर्स (Payment Gateway) पेटीएम पोस्टपेड लाँच झाल्यानंतर IRCTC तिकीट सेवांवर 'Book Now Pay Later' या सेवांचा लाभ घेऊ शकतात. 'पत्रिका'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पैसे नसतानाही बूक करा तिकीट पेटीएम पेमेंट गेटवे यूजर्स आता त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पेटीएम पोस्टपेड लाँच करून आयआरसीटीसी तिकीट सेवेवर 'Book Now Pay Later'चा फायदा घेऊ शकतात. पेटीएम पोस्टपेड यूजर्सना नंतर पैसे देण्याच्या पर्यायासह त्यांची तिकिटे IRCTC द्वारे बुक करण्याची परवानगी देते. ही सुविधा फायदेशीर ठरेल कारण यूजर्स तत्काळ पैसे न भरता ट्रेनचे तिकीट बुक करू शकतील. Multibagger Share: TATA च्या 'या' शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश! एक लाख झाले दोन कोटी रुपये 30 दिवसांचा कालावधी मिळेल पेटीएम आधीच अनेक सेवांमध्ये Buy Now Pay Later स्‍कीम चालवत आहे. युजर्सना ही स्कीम पंसतीस उतरत आहे. त्यामुळेच आता IRCTC तिकीट सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. पेटीएम पोस्टपेड आपल्या युजर्सना 30 दिवसांच्या कालावधीसाठी 60000 रुपये व्याजाशिवाय देत आहे. अशाप्रकारे आता महिन्याचे एकच बिल तयार होणार आहे. Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताना योग्य फंडची निवड कशी करायची? तिकीट कसे बुक करायचे? >> सर्वात आधी IRCTC वेबसाइटवर जा. >> प्रवास कुठून कुठे करायचा याचे डिटेल्स भरा. >> यानंतर पेमेंट सेक्शनमध्ये पे लेटर पर्याय निवडा. >> आता पेटीएम पोस्टपेड वर क्लिक करा. >> पेटीएमवर लॉगिन करा. >> आता यूजर्सला मिळालेला OTP नंबर टाका. >> अशा प्रकारे तुमचं तिकीट बुक करता येईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Indian railway, Money, Paytm

    पुढील बातम्या