Home /News /money /

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताना योग्य फंडची निवड कशी करायची?

Mutual Funds मध्ये गुंतवणूक करताना योग्य फंडची निवड कशी करायची?

म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांसोबत आपल्या भविष्यातील आर्थिक नियोजनाविषयी, गोल्सविषयी चर्चा करावी. जेणेकरुन पुढील किती वर्षामध्ये किती निधी उभा करायचा आहे याचा अंदाज तुम्हाला येईल.

    मुंबई, 1 एप्रिल : गुंतवणुकीचे सध्या अनेक पर्यात (Investment Options) उपलब्ध आहे. ऑनलाईन इनवेस्टिंग अॅप्समुळे (Online Apps) तर गुंतवणूक करणे अगदी सोपं झालं आहे. मात्र गुंतवणूक करताना योग्य खबरदारी, कमी जोखीम या सर्व बाजूने विचार प्रत्येक गुंतवणूकदार करतो. चांगल्या परताव्यासाठी शेअर बाजार पर्याय असला तरी त्यात जोखीम जास्त आहे. त्यामुळे अनेक जण म्युच्युयल फंड्सचा (Mutual Funds) मार्ग अवलंबतात. मात्र म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना आपल्या गरजेनुसार फंड निवडणे हे देखील तितकचं महत्त्वाचं असतं. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना काय करावं? म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांसोबत आपल्या भविष्यातील आर्थिक नियोजनाविषयी, गोल्सविषयी चर्चा करावी. जेणेकरुन पुढील किती वर्षामध्ये किती निधी उभा करायचा आहे याचा अंदाज तुम्हाला येईल आणि त्यामुळे म्युच्युयल फंड्सच्या कोणत्या योजनेत गुंतवणूक करता येईल हे स्पष्ट होईल. याशिवाय म्युच्युफंडमध्येही जोखीम आहेच, त्यामुळे आपली जोखीम पत्करण्याची क्षमता याबद्दलही तज्ज्ञांशी चर्चा करावी. Tax Saving Tips: नवीन वर्षात टॅक्स नियोजनाची चिंता सोडा, सोप्या टिप्स फॉलो करा आणि पैसे वाचवा दिर्घकालीन गुंतवणुकीचा (Long Term) विचार असेल तर म्हणजेच निवृतीनंतरचे नियोजन आणि त्यात थोडी जोखीम पत्करण्याची तयारी असेल, तर इक्विटी किंवा बॅलेन्स फंड (Equity Fund or Balanced fund) यातील गुंतवणूक आपल्यासाठी फायदेशीर ठरु शकते. Multibagger Share: TATA च्या 'या' शेअरमुळे गुंतवणूदार बनले कोट्यधीश! एक लाख झाले दोन कोटी रुपये अल्प कालावधीसाठी गुंतवणुकीचा (Short Term Investment) विचार असेल तर लिक्विड फंड (Liquid Fund) उत्तम असेल. तसेच नियमित गरजा भागवण्यासाठी नियमित उत्पन्न मिळवण्याचा विचार असेल तर मंथली इन्कम प्लॅन किंवा इन्कम फंडमध्ये (Monthly Income Fund) गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. आपल्या गरजांनुसार गुंतवणुकीचा विचार पक्का झाला की योग्य फंड निवडणेही सोपं होतं.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Mutual Funds

    पुढील बातम्या