LIC ADO Admit Card 2019: अ‍ॅडमिट कार्ड आज मिळणार,'असं' करा डाउनलोड

LIC ADO Admit Card 2019 - भारतीय जीवन विमा निगम ( LIC ) आज ( 29 जून ) अपरेंटिस डेव्हलमेंट ऑफिसर पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचं अ‍ॅडमिट कार्ड जारी करणार आहे

News18 Lokmat | Updated On: Jun 29, 2019 01:25 PM IST

LIC ADO Admit Card 2019: अ‍ॅडमिट कार्ड आज मिळणार,'असं' करा डाउनलोड

मुंबई, 29 जून : भारतीय जीवन विमा निगम ( LIC ) आज ( 29 जून ) अपरेंटिस डेव्हलमेंट  ऑफिसर पदांसाठी होणाऱ्या परीक्षेचं  अ‍ॅडमिट कार्ड  जारी करणार आहे. LIC आपल्या licindia.in या  ऑफिशियल वेबसाइटवर अ‍ॅडमिट कार्ड अपलोड करेल. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी अ‍ॅडमिट कार्ड म्हणजेच हाॅल तिकीट डाउनलोड करावं.

एलआयसी अपरेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदांसाठी नव्या उमेदवारांच्या भरतीसाठी LIC ADO 2019 परीक्षा 6 ते 13 जुलैपर्यंत देशातल्या विविध केंद्रांवर घेतली जाईल. उमेदवारांच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेल किंवा एसएमएस याद्वारे अ‍ॅडमिट कार्ड जारी केलं जाईल. सोबत रिक्त पदांबद्दल माहिती दिली जाईल. याआधीही LIC नं असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रिव्ह ऑफिसरसाठी Mains exam admit card जारी केले होते.

'ही' आहेत भारतातली महागडी शहरं, मुंबईचा कितवा नंबर?

बजेटमध्ये महिलांना मिळू शकतात 3 मोठ्या सवलती, तयार झाला प्लॅन

LIC ADO Admit Card 2019: असं करा डाउनलोड

Loading...

त्यासाठी तुम्ही LIC च्या अधिकृत वेबसाइटवर licindia.in जा.

होमपेजवर LIC ADO Admit Card 2019 या लिंकवर क्लिक करा.

तुमच्या समोर नवं पेज येईल

उमेदवाराला आपला रजिस्ट्रेशन नंबर, जन्म तारीख टाकावी लागेल

आता सबमिट बटणावर क्लिक करा

त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अ‍ॅडमिट कार्ड दिसेल

अ‍ॅडमिट कार्ड  सेव्ह करून ठेवा

घर खरेदी करणाऱ्यांना मोदी सरकार देऊ शकतं मोठा दिलासा

या पदासाठी एलआयसी बाहेरून आणि त्यांच्याकडे काम करत असलेल्यांमधूनही उमेदवार निवडेल. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी, जी Insurance Institute of India, Mumbai च्या फेलोशिपसाठी चालू शकेल.

या व्हेकन्सीची पोस्टिंग्ज देशातल्या वेगवेगळ्या राज्यात होतील. LIC ADO पदावर निवडले गेलेल्या उमेदवारांना महिन्याला 34,503 रुपये पगार मिळेल. ज्या उमेदवारांकडे 2 वर्षांचा अनुभव असेल, त्यांना प्राधान्य दिलं जाईल.

घाटकोपरमध्ये संरक्षित भिंत पडली तर विरारमध्ये प्लॅटफॉर्मचा भाग कोसळला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2019 01:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...