नवी दिल्ली, 09 जून: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) नियम आणि योग्य निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल बँक ऑफ इंडियाला (BOI Bank of India) 4 कोटींचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने दंड ठोठावल्यानंतर मंगळवारी बँक ऑफ इंडियाचे (BOI) शेअर जवळपास 4 टक्क्यांनी घसरून जवळपा 81.40 रुपयांवर आले होते, सोमवारी बाजार बंद होत असताना हा दर 84.60 रुपये होता. दरम्यान व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर यामध्ये हळूहळू वाढ झाली आणि BOI चे शेअर 2.78 टक्क्यांच्या घसरणीनंतर 82.25 रुपयांवर बंद झाले. मंगळवारी जवळपास सर्वच बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती आणि Nifty Bank 1% पेक्षा जास्त अर्थात 358.35 अंकांनी घसरून 35,085.30 अंकांवर बंद झाले होते. आरबीआयने बँक ऑफ इंडियावर निकषांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला होता.
काय आहे प्रकरण?
आरबीआयने एका निवेदनात असं म्हटलं आहे की, बँक ऑफ इंडियाच्या इन्स्पेक्शन ऑफ सुपरवायजर इव्हॅल्यूएशन (ISE) साठी 31 मार्च 2019 रोजी वैधानिक तपासणी केली गेली. बँकेने एका खात्यात फसवणूक झाल्याची समीक्षा केली होती आणि त्याच रिपोर्ट (FMR) सोपवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) रिस्क असेसमेंट रिपोर्टच्या पडताळणीत अशी माहिती प्राप्त झाली की BOI ने निश्चित निकषांचे पालन केले नाही आहे. आरबीआयला अशी माहिती मिळाली की बँकेने झालेल्या फसवणुकीची सूचना त्यांना वेळेत दिली नाही आणि फ्रॉड अॅसेट्सची त्यांनी विक्री केली. या सरकारी बँकेला आरबीआयने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ज्यामध्ये या बँकावर दंड का आकारू नये यासंदर्भात कारण विचारण्यात आलं आहे. आरबीआयच्या मते नियामक पालन न केल्यामुळे बँकेवर दंड ठोठावण्यात आला आहे.
हे वाचा-खूशखबर! घरभाडं भरणाऱ्यांसाठी Paytm ची खास ऑफर, मिळेल 10000 रुपयांपर्यंतचा फायदा
बँक ऑफ इंडिया देखील होणार खाजगी?
बँकांच्या खाजगीकरणासंदर्भात (Bank Privatization) काही बातम्या समोर येत आहेत. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये दाखल केलेल्या बजेटमध्ये दोन सरकारी बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली होती. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) आणि इंडियन ओवरसीज बँकेतील (Indian Overseas Bank) भागीदारी विकण्याची योजना सरकार आखत आहे. मात्र आता अशी देखील बातमी समोर येते आहे की सरकार बँक ऑफ इंडियामध्ये देखील त्यांची भागीदारी विकू शकते, अर्थात बँक ऑफ इंडिया देखील खाजगी होण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Bank details, Rbi, Rbi latest news