मुंबई : यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आरोग्य आहे. चार महत्त्वाच्या गोष्टींवर यंदाचं बजेट असून त्यापैकी एक हेल्थ आहे. त्यामुळे यावेळी महानगरपालिकेनं लोकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी काही तरतूदी केल्या आहेत. याशिवाय यंदा पहिल्यांदाच प्रशासनाकडून नागरिकांच्या बजेटबाबत सुचना मागविण्यात आल्या त्यात ९६५ लोकांनी पालिकेच्या बजेटसाठी सुचना पाठवल्या त्यातील निम्म्याहून अधिक सुचनांचे बजेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेनं मुंबईकरांना दिलेलं वचन पूर्ण करत असल्याचं सांगितलं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने क्लिनिक सुरू केली आहे. त्यापैकी १०६ क्लिनिक सुरू असून त्याचा लाख 2 लाखहून अधिक लोकांनी घेतल्याची माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिली.
BMC budget 2023 : निवडणुकाच्या नावानं चांगभलं, बजेटमध्ये मुंबईकरांना दिलासाया क्लिनिकमध्ये १४७ टेस्ट फ्रीमध्ये होतात. १० टेस्टसाठी नॉमिनस चार्ज आहेत. त्यामुळे या योजना नागरिकांसाठी फायद्याच्या आहेत. पुढच्या वर्षापर्यंत आणखी १०२ क्लिनिक हळूहळू सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय यंदाच्या बजेटमध्ये हेल्थसाठी देखील मोठ्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. आरोग्य सुविधांवरील अंदाजित खर्च ₹6309.38 कोटी इतका असून तो एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12% इतका आहे. भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास ₹110 कोटी गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम ₹110 कोटी एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹95 कोटी कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाचे प्रस्तावित बांधकाम ₹75 कोटी सायन रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास ₹70 कोटी एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय ₹60 कोटी वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹53.60 कोटी एल विभागातील संघर्ष नगर येथे, रुग्णालयाकरीता राखीव असलेल्या भूखंड क्र. 11A/4 चा विकास ₹35 कोटी ऍक्वर्थ कृष्ठरोग रुग्णालयाच्या आवारात वसतीगृहाचे बांधकाम ₹28 कोटी नायर दंत महाविद्यालयाचे विस्तारीकरण ₹17.50 कोटी ई विभाग, कामाठीपुरा येथील सिद्धार्थ / मुरली देवरा नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास ₹12 कोटी ओशिवरा प्रसूतीगृहाची ₹9.50 कोटी दुरुस्ती/ पुनर्बांधकाम के.ई.एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटरची दर्जोन्नती ₹7 कोटी आर. एन. कूपर रुग्णालय महाविद्यालयाचे बांधकाम ₹5 कोटी येथे वैद्यकीय टाटा कंपाऊंड आणि हाजी अली वसतीगृहाचे बांधकाम ₹2 कोटी के. ई. एम. रुग्णालयामध्ये प्रोटॉन थेरेपी कर्करोग रुग्णालयाच्या बांधकामाकरीता तरतूद ₹1 कोटी