मुंबई, 04 फेब्रुवारी : देशातली सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प यंदा प्रशासकाकडून सादर करण्यात आला आहे. यंदाचं हे बजेट तब्बल 52619 हजार कोटींचं आहे. मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ नाही.
मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाचा यंदाचा २०२२-२३ या वर्षीचा ३३७०.२४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज पालिकेचे सहआयुक्त अजित कुमार यांनी आज शिक्षण समितीला सादर केला. कोरोनाच्या काळात गेल्या वर्षभरात शिक्षणावर पुरेसा खर्च झाला नसल्याने यंदाच्या शिक्षण विभाागाच्या अर्थसंकल्पात वाढ झाली आहे. कार्यानुभव शिक्षण आॉनलाईन, टॉय लायब्ररी, व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण, ई वाचनालय, डिजिटल क्लासरूम, टॅब पुरवठा, असा डिजीटल शिक्षणावर भर देणारा हा अर्थसंकल्प आहे.
विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच प्रशासनाकडून नागरिकांच्या बजेटबाबत सुचना मागविण्यात आल्या त्यात ९६५ लोकांनी पालिकेच्या बजेटसाठी सुचना पाठवल्या त्यातील निम्म्याहून अधिक सुचनांचे बजेटमध्ये समावेश करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर
मुंबई मनपाचा 52619 कोटींचा अर्थसंकल्प
मनपाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा अर्थसंकल्प
मनपा बजेटनं पहिल्यांदाच पन्नाशी केली पार
मुंबई मनपाकडून यंदा कोणतीही करवाढ नाही
मुंबईकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा
'बेस्ट'ला 1382 कोटी रुपये कर्ज स्वरूपात
मुंबईकरांना 32 ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ
मुंबईत 91 ठिकाणी रस्त्यावरील वाहनतळ
व्यवसाय विकास विभागासाठी 10 कोटी
मुंबईतील कोस्टल रोडसाठी 3545 कोटी
सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 2792 कोटी
राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद
प्रदूषण नियंत्रणासाठी दीड हजार कोटी
मुंबई अग्निशमन दलासाठी 227 कोटी
मनपा सामाजिक उपक्रमासाठी भरीव तरतूद
महिला बचतगटांसाठी 11.65 कोटींची तरतूद
महिला अर्थसहाय्य योजनेसाठी 100 कोटी
दिव्यांग व्यक्ती अर्थसहाय्य 25.32 कोटी
ज्येष्ठ नागरिकांना अर्थसहाय्य 11 कोटी
महिलांसाठी प्रशिक्षण योजना 6.44 कोटी
तृतीयपंथीयांसाठी अर्थसहाय्य 2 कोटी रुपये
तृतीयपंथीयांसाठी पहिल्यांदाच अर्थसहाय्य योजना
मुंबई महापालिका शिक्षण समितीचा अर्थसंकल्प
सहआयुक्त अजित कुमारांनी सादर केला अर्थसंकल्प
मनपा शिक्षण समितीचा 3347 कोटींचा अर्थसंकल्प
यंदाच्या शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात मोठी वाढ
डिजिटल शिक्षणावर भर देणारा अर्थसंकल्प - मनपा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.