Home /News /money /

ड्रॅगनला नमवण्यासाठी मोदी सरकार मास्टरस्ट्रोकच्या तयारीत! चीनच्या दुश्मन देशांशी करणार हातमिळवणी

ड्रॅगनला नमवण्यासाठी मोदी सरकार मास्टरस्ट्रोकच्या तयारीत! चीनच्या दुश्मन देशांशी करणार हातमिळवणी

भारत चीनच्या दुश्मन देशांशी बातचीत करण्याची शक्यता आहे. चीनच्या वागण्यामुळे भारत आणि तैवान (Taiwan) दोघेही त्रस्त आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता अधिक आहे.

    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : भारत लडाख सीमावादानंतर (India-China Border Tension)तणाव वाढल्यानंतर चीनला नमवण्याची एकही संधी भारताकडून सोडण्यात येत नाही आहे. चीनच्या विविध कुरघोड्या तरी देखील सुरूच  आहेत. या सर्वांमध्ये भारत चीनच्या दुश्मन देशांशी बातचीत करण्याची शक्यता आहे. चीनच्या वागण्यामुळे भारत आणि तैवान (Taiwan) दोघेही त्रस्त आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता अधिक आणि लवकरच ट्रेड डीलबाबत (Trade Deal) औपचारिक बातचीत देखील सुरू होऊ शकते. तैवान गेल्या अनेक वर्षांपासून ट्रेड डीलवर बातचीत करू इच्छित आले, मात्र भारताकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. लडाख सीमावादापूर्वी चीनची नाराजी  टाळण्यासाठी भारताने याआधी याबाबत बातचीत केली नव्हती. आता काही दिवसांपासून सरकार तैवानशी ट्रेड डील करण्याबाबत सकारात्मक विचार करत आहे. तैवानमधील काही कंपन्यांना स्मार्टफोन बनवण्याची दिली आहे मंजूरी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तैवानशी ट्रेड डील केल्यानंतर भारताला टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये जास्त गुंतवणूक मिळू शकते. त्यांनी अशी माहिती दिली की, 'अजून हे निश्चित झाले नाही आहे की, ही बातचीत सुरू करण्यासाठी अंतिम निर्णय केव्हा घेतला जाईल.' (हे वाचा-कोरोना काळात जगभरातील अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलंय, चीनचा GDP मात्र वधारला) दरम्यान याच महिन्यात भारत सरकारने स्मार्टफोन बनवण्यासाठी अनेक कंपन्यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तैवानचा फॉक्सकॉन टेक्नोलॉजी ग्रुप, विस्ट्रॉन ग्रुप आणि पेगाट्रॉन कॉर्प समाविष्ट आहे. याबाबत वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अद्याप कोणती प्रतिक्रिया दिली नाही आहे. भारत-तैवानमध्ये 2018 मध्ये झाला होता द्विपक्षीय गुंतवणूक करार भारतासह ट्रेड डीलबाबत चर्चा सुरू झाली तर तैवानसाठी हा मोठा विजय असेल. चीनच्या दबावामुळे तैवानला नेहमी कोणत्याही मोठ्या देशाशी ट्रेड डील करताना संघर्षाचा सामना करावा लागला आहे. अधिकांश देशांप्रमाणे भारतानेही अद्याप औपचारिक मान्यता दिली नाही आहे. (हे वाचा-Gold Silver Price: चांदी 1126 रुपयांनी उतरली, सोन्याचे भावही घसरले; वाचा नवे दर) दोन्ही देशांच्या रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसेसच्या स्वरुपात अनऑफिशिअल डिप्लोमॅटिक मिशन आहे. दोन्ही देशांनी आर्थिक संबंध मजबुत करण्यासाठी 2018 मध्ये अपडेटेड द्विपक्षीय गुंतवणूक करारावर (Bilateral Investment Agreement) स्वाक्षरी केली होती. 2019 मध्ये दोन्ही देशातील व्यापार 18 टक्क्याने वाढून 7.2 अब्ज डॉलर झाला होता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: China, India china, Money, Taiwan

    पुढील बातम्या