कोरोना काळात जगभरातील अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलंय, चीनचा GDP मात्र वधारला
जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनमध्ये (Chinese Economy Growing) आर्थिक वर्ष 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये विकास दर (GDP) 4.9 टक्के आहे. चिनी अर्थव्यवस्था कोरोना व्हायरस (Coronavirus) पँडेमिकआधी असणाऱ्या जीडीपी स्तराच्या जवळपास पोहोचली आहे.


जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीनमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये विकास दर (GDP) 4.9 टक्के आहे. चिनी अर्थव्यवस्था कोरोना व्हायरस (Coronavirus) पँडेमिकआधी असणाऱ्या जीडीपी स्तराच्या जवळपास पोहोचली आहे. (फोटो:AP)


चीनचा आर्थिक विकास दर तिसऱ्या तिमाहीमध्ये 5.2 टक्के राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. दुसऱ्या तिमाहीमध्ये चीनचा विकास दर 3.2 टक्के होता. गेल्यावर्षी या कालावधीसाठी औद्योगिक उत्पादन दर देखील 6.9 टक्के होता. (फोटो: AP)


चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या मते जुलै ते सप्टेंबर तिमाहीचा विकास दर अंदाजापेक्षा कमी आहे. एनबीएस एजन्सीने असे म्हटले आहे की, येणाऱ्या काळात पुन्हा एकदा अस्थिरता पाहायला मिळू शकते. (फोटो: AP)


चिनी अर्थव्यवस्थेमध्ये लॉकडाऊन आणि पँडेमिक दरम्यान उचलण्यात आलेल्या पावलांमुळे सुधारणा होत आहे. तर जगभरातील इतर देश लॉकडाऊन आणि कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात आहेत (फोटो: AP)