Home /News /money /

Gold Silver Price: चांदी 1126 रुपयांनी उतरली, सोन्याचे भावही घसरले; वाचा नवे दर

Gold Silver Price: चांदी 1126 रुपयांनी उतरली, सोन्याचे भावही घसरले; वाचा नवे दर

Gold Price, 20 October 2020: परदेशी बाजारात किंमती कमी झाल्यानंतर देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत. व्यापारी वर्गाच्या मते दर आणखी कमी होऊ शकतात.

    नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : जगभरातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबत अनिश्तितता कायम आहे. त्यामुळे परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती सातत्याने उतरत आहेत. याचाच परिणाम आज देशांतर्गत बाजारावर देखील दिसून आला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर (Gold Price Today) 268 रुपयांनी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात 1126 रुपयांची घसरण पाहायला मिळाळी. तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याच्या किंमती वाढू शकतात. डिसेंबर अखेरपर्यंत सोन्याचे दर सर्वाधिक स्तरावर पोहचू शकतात. सोन्यात दर 500 ते 600 रुपयांच्या घसरणीवर गुंतवणूक केली जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते दिवाळीनंतर सोन्याचे दर 52500 ते 53000 होऊ शकतात. सोन्याचे आजचे दर (Gold Price on 20th October 2020) HDFC सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत मंगळवारी 268 रुपये प्रति तोळाने कमी झाल्या आहेत. यांनतर सोन्याचे दर 50,860 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर सोमवारी सोन्याच्या किंमतीचे ट्रेडिंग 51,128 रुपये प्रति तोळावर बंद झाले होते. चांदीचे आजचे दर (Silver Price on 20th October 2020) मंगळवारी चांदीचे दर देखील कमी झाले आहेत. चांदी 1126 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे दर 62,189 रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहेत. तर सोमवारी चांदीचे दर 63,315 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड  करत होते. नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा मिळेल स्वस्त सोनेखरेदीची संधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सॉव्हरेन गोल्डची विक्री करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित 5 महिन्यांमध्ये 5 वेळा गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीची संधी मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये ही संधी 12 तारखेला मिळाली होती. (हे वाचा-कोरोना काळात जगभरातील अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडलंय, चीनचा GDP मात्र वधारला) आता पुढची संधी नोव्हेंबरमध्ये मिळणार आहे. 9 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान आठव्या सीरिज अंतर्गत गोल्ड बाँड जारी केले जाणार आहेत. या दरम्यान गुंतवणूक करणाऱ्यांना 18 नोव्हेंबर रोजी बाँड सुपूर्द केले जातील. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या