जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सामान्यांना दिलासा नाहीच! 5 महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर किरकोळ महागाई दर, खाद्यपदार्थ दरवाढीचा परिणाम

सामान्यांना दिलासा नाहीच! 5 महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर किरकोळ महागाई दर, खाद्यपदार्थ दरवाढीचा परिणाम

सामान्यांना दिलासा नाहीच! 5 महिन्यांच्या सर्वोच्च स्तरावर किरकोळ महागाई दर, खाद्यपदार्थ दरवाढीचा परिणाम

देशातील खाद्यपदार्थ्यांच्या (Food Inflation) किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दरातही वाढ झाली आहे. किरकोळ महागाई दर डिसेंबर महिन्यात पाच महिन्याच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 जानेवारी: देशातील खाद्यपदार्थ्यांच्या (Food Inflation) किमतीत वाढ झाल्याने किरकोळ महागाई दरातही वाढ झाली आहे. किरकोळ महागाई दर डिसेंबर महिन्यात पाच महिन्याच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. किरकोळ महागाई दर डिसेंबर महिन्यात 5.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. आधीच्या महिन्यात नोव्हेंबर 2021 मध्ये हा दर 4.91 टक्के होता. याशिवाय भारतातील कारखान्यांच्या उत्पादनातही (Industrial Production IPP) नोव्हेंबर महिन्यात 1.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2020 मध्ये या महिन्यात IPP ग्रोथ -1.6% होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) बुधवारी याबाबत स्वतंत्र आकडेवारी सादर केली. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) आधारित किरकोळ महागाई नोव्हेंबर 2021 मध्ये 4.91 टक्के आणि डिसेंबर 2020 मध्ये 4.59 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्य चलनवाढीचा नोव्हेंबरमध्ये 1.87 टक्के असणारा दर डिसेंबरमध्ये 4.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. हे वाचा- इंधनाच्या दरात आज काय झाला आहे बदल? वाचा काय आहे 1 लीटर पेट्रोलचा भाव रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया (RBI Latest News) द्वैमासिक चलनविषयक आढाव्यात प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा तपशीलवार डेटा पाहते. प्रतिकूल आधारभूत परिणामामुळे चलनवाढीचा दर आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीत उच्च राहील, असा अंदाज केंद्रीय बँकेने व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बँकेच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत एकूण महागाईचा दर सर्वोच्च पातळीवर असेल. त्यानंतर तो खाली येईल, असा RBI चा अंदाज आहे. महागाई दर 4% (प्लस-मायनस 2%) ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे लक्ष्य आहे. हे वाचा- नोकरीचं फार टेन्शन नको; फक्त 20 हजारात सुरू करा हा व्यवसाय, 4 लाखांपर्यंत कमवाल महागाई दरात झालेला बदल >> अन्नधान्य चलनवाढीचा दर नोव्हेंबरमध्ये 1.87%  होता तो डिसेंबरमध्ये 4.05% वर पोहोचला आहे » डिसेंबरमध्ये व्हेजिटेबल इन्फ्लेशन दर -13.62% च्या तुलनेत -2.99% आहे. » क्लोदिंग अँड फूटवेअर इन्फ्लेशन दर डिसेंबरमध्ये 7.94 टक्क्यांवरून 8.3 टक्क्यांवर पोहोचली आहे. » डाळींचा महागाई दर जो नोव्हेंबरमध्ये 3.18 टक्के होता तो डिसेंबमध्ये 2.43 टक्क्यांवर घसरला आहे » हाउसिंग इन्फ्लेशन दर नोव्हेंबरमधील 3.66% च्या तुलनेत 3.61% वर पोहोचला आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात