Home /News /money /

मोठी घडामोड! RBI ने या बँकेवरील निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले, खातेधारकांना नाही मिळणार काही सुविधा

मोठी घडामोड! RBI ने या बँकेवरील निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले, खातेधारकांना नाही मिळणार काही सुविधा

आर्थिक संकटात सापडलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील (PMC Bank) निर्बंध RBI ने 31 मार्चपर्यंत वाढवले आहेत.

    नवी दिल्ली, 19 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या आणि आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर (PMC Bank) आणलेले निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवले आहेत. केंद्रीय बँकेने असं म्हटले आहे की, 23 सप्टेंबर 2019 रोजी जारी करण्यात आलेले निर्देश, ज्यामध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे, त्यांची वैधता 23 डिसेंबर 2020 या तारखेवरून वाढवून 31 मार्च 2021 करण्यात आली आहे. दरम्यान बँकेसाठी एक चांगली बातमी अशी आहे की, याच्या पुनर्रचनेसाठी आणि यामध्ये इक्विटी गुंतवणूक करण्यासाठी अर्थात भागीदारी खरेदी करण्यासाठी आतापर्यंत 4 एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) प्राप्त झाले आहेत. गेल्या महिन्यात, पीएमसी बँकेने इक्विटी भागीदारीच्या माध्यमातून बँकेच्या पुनर्रचनेसाठी संभावित गुंतवणुकदारांकडून EOI मागवले होते. हे EOI जमा करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर होती. ज्यामध्ये 4 गुंतवणुकदारांनी रुची दाखवली होती. दरम्यान अद्याप आरबीआयने या कंपन्यांबाबत खुलासा केला नाही आहे की, कोणत्या कंपन्या  PMC मधील भागीदारी घेऊ इच्छित आहेत. (हे वाचा-या बँकामध्ये FD केल्यास आहे चांगला नफा कमावण्याची संधी, मिळेल 7.50% पर्यंत व्याज) ठेवीदारांचे हित लक्षात घेता या प्रस्तावांचा बँकेकडून अभ्यासपूर्ण विचार केला जाईल आणि निवडण्यात आलेल्या कंपन्यांना आणि गुंतवणुकदारांना बँकेच्या खरेदीसाठीच्या बिडिंग प्रक्रियेत (Bidding process) सामील केलं जाईल. काय आहे प्रकरण? पीएमसी बँकेने बेकायदेशीर पद्धतीने HDIL ग्रुपला 6500 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. जे सप्टेंबर 2019 मध्ये बँकेच्या एकूण कर्ज देण्याच्या आकारमानाच्या (Total Loan Book Size) अर्थात 8880 कोटी रुपयांच्या 73 टक्के होतं. मार्च 2019 मध्ये बँकेचा डिपॉझिट बेस 11,617 कोटी रुपये होता. बँकेतील हा घोटाळा समोर आल्यानंतर PMC बँकेचे माजी एमडी जॉय थॉमस आणि माजी चेअरमन  वरयाम सिंह यांना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईतील इकॉनॉमिक ऑफिस विंगने अटक केली होती. याशिवाय बँकेच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. (हे वाचा-या दिवसापर्यंत येणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे, पीएम मोदींनी दिली माहिती) RBI ने PMC बोर्ड केलं बरखास्त बँकेने अनेक आर्थिक अनियमितता आणि रिअल इस्टेट डेव्हलपर एचडीआयएलला दिलेल्या कर्जाची बाब लपवून ठेवली होती. यामुळे आरबीआयने गेल्या वर्षी 23 सप्टेंबर रोजी पीएमसीचे बोर्ड बरखास्त केलं. बँकेतून पैसे काढण्यासह विविध निर्बंध घालण्यात आले होते. सुरुवातीला आरबीआयने ठेवीदारांना 1000 रुपये काढण्याची परवानगी दिली, नंतर जून 2020 मध्ये ते वाढवून 1 लाख रुपये केले. रिझर्व्ह बँकेने 22 डिसेंबर 2020 पर्यंत पीएमसीवर सर्व निर्बंध लागू असल्याचे म्हटले होते सप्टेंबर 2019 मध्ये समोर आला PMC बँक घोटाळा आरबीआयने म्हटलं आहे की या परिस्थितीतून बँकेला बाहेर काढण्यासाठी सर्व भागधारकांशी बोलणी केली जात होती, परंतु कोरोना आणि सध्याच्या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे संपूर्ण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. याशिवाय बँकेची नेटवर्थ देखील कमी झाल्याने आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे बँकेसाठी कोणताही प्रस्ताव मिळवणे आव्हानात्मक बनलं आहे. पीएमसी बँकेतील घोटाळा प्रकरण सप्टेंबर 2019 मध्ये समोर आले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Rbi, Rbi latest news

    पुढील बातम्या