नवी दिल्ली, 11 ऑगस्ट: कोरोना काळात अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचे (Work From Home) स्वरुप स्विकारले आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे कर्मचारी घरातून काम करत आहे. दरम्यान जगभरातील महत्त्वाची कंपनी असणाऱ्या गुगलने (Google) वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी (Google employees) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात होण्याची शक्यता आहे. गुगलमध्ये काम करणारे कर्मचारी ऑफिसमधून काम करण्याऐवजी घरातून काम करण्याचा पर्याय निवडत असतील तर त्यांच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता आहे.
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते, ज्या कर्मचाऱ्यांनी कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम (Permanent Work From Home) करत आहेत, त्यांच्या पगारात 10 टक्के कपात करण्याची योजना आहे. अमेरिका स्थित सिलिकॉन व्हॅलीमध्ये घर आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांवर कामकाजासंदर्भात विविध प्रयोग केले जात आहेत. याआधी फेसबुक आणि ट्विटरकडून देखील पगारकपात करण्यात आली आहे.
हे वाचा-बँकांना RBI चा झटका! ATM मध्ये पैसे नसतील तर द्यावा लागेल 10000 रुपयांचा दंड
जागेवरुन निश्चित होतो पगार
गुगलच्या प्रवक्यांनी अशी माहिती दिली आहे की, गुगलकडून दिले जाणारे पॅकेज नेहमी लोकेशनवर आधारित असते. गुगलने जूनमध्ये वर्क लोकेशन टूल (Work Location Tool) लाँच केले होते. प्रत्येक शहरानुसार कर्मचाऱ्याचा पगार निश्चित केला जातो. जे लोकं महागडं राहणीमान असाणाऱ्या शहरात राहतात त्यांचा पगार स्वस्त शहरात राहणाऱ्यांपेक्षा जास्त असतो. गुगलच्या या निर्णयानंतर अनेक छोट्या कंपन्यांनी देखील हायरिंग (Hiring) लोकेशनच्या हिशोबाने करण्यास सुरुवात केली आहे.
हे वाचा-Google वर 5000% पेक्षा जास्त सर्च करण्यात ही गोष्ट, जाणून घ्या काय आहे हा शब्द?
किती होईल पगारकपात?
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते, जे कर्मचाऱ्यांना Stamford न्यूयॉर्कपासून एका तासाच्या अंतरावर आहे, स्टँफोर्ड याठिकाणी काम करणारा कर्मचारी जर घरातून काम करत असेल तर त्याला न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या त्याच्या सहकाऱ्यापेक्षा 15 टक्के पगार तुलनेने कमी मिळेल. याशिवाय गुगलच्या कर्मचाऱ्याने एखाद्या खर्चिक किंवा महागड्या शहरात राहण्यास सुरुवात केली तर त्याच्या पगारात 25 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. तर सिअॅटल, बोस्टन आणि सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 ते 10 टक्क्यांची कपात होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Work from home