नवी दिल्ली, 18 मार्च : कोरोनाव्हायरसच्या परिणामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था ढासळत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे अनेक व्यवसाय COVID-19 च्या प्रादुर्भावामुळे ठप्प आहेत. अनेक हॉटेल व्यवसायांवर देखील गदा आली आहे. जगातील सर्वात मोठी हॉटेल चेन असणाऱ्या मॅरियट इंटरनॅशनलने (Marriott International) कर्मचार्यांना रजेवर पाठवले आहे. या सुट्ट्या अनपेड असणार आहेत, म्हणजेच यादरम्यान कर्मचार्यांना कोणताही पगार मिळणार नाही. कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे पर्यटन तसंच ह़ॉटेल व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी हॉटेल व्यवसाय ठप्प होऊ लागला आहे. मॅरियटने जवळपास सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांना सुट्टीवर पाठवले आहेत. यासह कंपनीने आपली काही हॉटेल्सही बंद करण्यास सुरवात केली आहे. कंपनीने जवळपास त्यांच्या 10 हजार कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवले आहे.
(हे वाचा-कोरोनामुळे सोने व्यापाराची चमक गायब, दागिन्यांची मागणी 75 टक्क्यांनी घटली)
मॅरियटने सीएनएन बिझिनेसला (CNN Business) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोनामुळे त्यांचा व्यवसाय कोसळत आहे. त्यांच्या व्यवसायातील मागणीत त्याला लक्षणीय घट झाली आहे. मॅरियटच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, ‘आम्ही आमच्या भागीदारांना, ग्राहकांना आणि आमच्या मालकांना मदत करण्यावर भर देत आहोत. आम्ही शक्य तितक्या दृष्टीने कोरोनाचा आमच्या व्यवसायावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.’
(हे वाचा-कोरोनाबाधित इटलीतून मुंबईच्या मुलीची सुटका, वडिलांनी मोदींना म्हटलं ‘बापमाणूस’)
त्याचप्रमाणे अनेक देशातील एअरलाइन व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. कारण बहुतांश देशांमधील सरकारने विमान उड्डाणांवर बंदी किंवा मर्यादा घातली आहे. कोरोनाव्हायरसमुळे GoAir ने मंगळवारपासून आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली आहे. उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे काही कालावधीनंतर कंपनी आपल्या कर्मचार्यांना पगाराच्या रजेवर पाठवेल. मात्र कंपनी कर्मचार्यांच्या पगाराच्या हप्त्यात 20 टक्के कपात करण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.