नवी दिल्ली,18 मार्च : कोरोना व्हायरसमुळे (Corornavirus) भारतामधील वेगवेगळ्या व्यवसायांना फटका बसला आहे. अनेक इंडस्ट्री अगदी तळागाळात पोहोचल्या आहेत. कोरोनामुळे जागतिक मंदीचे सावटही आहे. अशात सर्वात मोठा फटका बसला आहे तो भारतातील सोने व्यापाराला. पीटीआय वृत्तसंस्थेच्या मते कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशातील Gems and Jewellery व्यापाराची चमक कमी होत आहे. दररोज कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे या उद्योगातील मागणी 75 टक्क्यांनी कमी झाली आहे. आता केवळ 20 ते 25 टक्के एवढाच व्यवहार या उद्योगामध्ये होत आहे. (हे वाचा- कोरोनामुळे शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 30 हजारपेक्षा कमी तर निफ्टी 8,500 वर ) ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे अध्यक्ष अनंतर पद्मनाभन यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण असल्यामुळे रिटेलर्स केवळ 20 ते 25 टक्के व्यवहारच करू शकत आहेत.’ सोन्याच्या दागिन्यांची मागणी का घटली? -अनंत पद्मनाभन यांनी सांगितलं की, ‘कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचप्रमाणे खबरदारीसाठी सरकारने मॉल, सिनेमागृह त्याचप्रमाणे अन्य गर्दीची ठिकाणं बंद ठेवली आहेत. आता फक्त गरजेच्या वस्तूच केवळ खरेदी करता येत आहेत -चालू आर्थिक वर्षासाठी (2019-20) मार्च हा शेवटचा महिना आहे. त्यामुळे या महिन्यात उर्वरित टॅक्स रिटर्न भरण्यासाठी असणारा दबाव वाढत आहे. पद्मनाभन यांनी सांगितलं की, टॅक्स संबधित अनेक कामं आहेत, ज्यामध्ये अडव्हान्स टॅक्स, जीएसटी यांचा समावेश आहे, त्यामुळे व्यापार कमी होत चालला आहे. -उम्मेदमल तिलोकचंद झवेरी ज्वेलरी दुकानाचे मालक कुमार जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नसराईच्या काळातही मुंबईतीली झवेरी बाजारातील चमक गायब आहे. त्यांनी सांगितलं की, जुलैपर्यंत लग्नाच्या तारखा असतात. या दरम्यान सोने व्यवसायात वाढ होते. -लाला जुगल किशोर ज्वेलर्सचे संचालक तान्या रस्तोगी यांच्या मते, देशामध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ मुख्यत: लग्नसराईच्या दिवसात होते. मात्र कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे असे अनेक कार्यक्रमच रद्द झाले आहेत. लग्नसराईच्या काळात केली जाणा री खरेदी त्यामुळे ठप्प झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.