मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' शेअर्सने 2021 मध्ये राकेश झुनझुनवाला यांना केलं मालामाल! तुमच्याकडे यापैकी कोणता स्टॉक आहे?

'या' शेअर्सने 2021 मध्ये राकेश झुनझुनवाला यांना केलं मालामाल! तुमच्याकडे यापैकी कोणता स्टॉक आहे?

Rakesh Jhunjhunwala Stocks: नेहमीप्रमाणे राकेश झुनझुनवाला यांनी 2021 मध्येही चांगला नफा कमावला आहे. त्याच्या काही स्टॉक्सचे पैसे दुप्पट झाले आहेत. यामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors) आणि अॅपटेकचाही (Aptech) समावेश आहे. चला याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ.

Rakesh Jhunjhunwala Stocks: नेहमीप्रमाणे राकेश झुनझुनवाला यांनी 2021 मध्येही चांगला नफा कमावला आहे. त्याच्या काही स्टॉक्सचे पैसे दुप्पट झाले आहेत. यामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors) आणि अॅपटेकचाही (Aptech) समावेश आहे. चला याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ.

Rakesh Jhunjhunwala Stocks: नेहमीप्रमाणे राकेश झुनझुनवाला यांनी 2021 मध्येही चांगला नफा कमावला आहे. त्याच्या काही स्टॉक्सचे पैसे दुप्पट झाले आहेत. यामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors) आणि अॅपटेकचाही (Aptech) समावेश आहे. चला याबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ.

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 30 डिसेंबर : भारतीय शेअर मार्केटमधील (Share Market) बिग-बुल (Big Bull) अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांनी नेहमीप्रमाणं 2021 मध्येही चांगला नफा कमावला आहे. भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणं आणि ती दीर्घकाळ टिकवून ठेवणं ही हुशारीची गोष्ट आहे, असं त्यांचं मत आहे. सामान्यपणे झुनझुनवालांची गुंतवणूक पाहून अनेक ट्रेडर्स त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. 2021मध्येही त्यांना आपल्या हुशारीचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्यांनी काही अशा स्टॉक्समध्ये (Stocks) गुंतवणूक केली की, ज्यातून 100 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळाले.

  आज आम्ही तुम्हाला झुनझुनवाला यांनी गुंतवणूक केलेल्या अशा सहा स्टॉक्सची माहिती सांगणार आहोत, ज्यांनी 100 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. यामध्ये टाटा मोटर्स (Tata Motors), मॅन इन्फ्रा (Man Infra), डीबी रियल्टी (D B Realty), अनंत राज (Anant Raj), अॅपटेक (Aptech) आणि टार्क (TARC) यांचा समावेश आहे.

  टाटा मोटर्स (Tata Motors) – 156 टक्के

  राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर 2020 ला संपलेल्या तिमाहीत या बड्या ऑटो कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. यावर्षी स्टॉकमध्ये वाढ झाल्यानं झुनझुनवाला यांना भरपूर नफा (Profit) मिळाला. सध्या त्यांच्याकडे टाटा मोटर्सचे 3.67 कोटी शेअर्स आहेत. या शेअर्सची होल्डिंगची व्हॅल्यू (Holding Value) एक हजार 752 कोटी रुपये इतकी आहे.

  मॅन इन्फ्रा (Man Infra constrcution) – 333 टक्के

  2021 मध्ये 333 टक्के वाढीसह मॅन इन्फ्रास्ट्रक्चरचा स्टॉक गगनाला भिडला आहे. सध्या 101 रुपयांच्या आसपास या कंपनीच्या एका शेअरची किंमत आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 30 लाख शेअर्स (1.21 टक्के हिस्सा) आहेत. झुनझुनवाला यांनी मॅन इन्फ्रामध्ये गुंतवणूक करून अर्ध्या दशकापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. झुनझुनवालांच्या कंपनीतील स्टेकची किंमत 29.7 कोटी रुपये आहे. मॅन इन्फ्राचा स्टॉक हा झुनझुनवालांचा दरवर्षी सर्वोत्तम कामगिरी करणारा स्टॉक आहे.

  Business: घरच्या घरी सुरु करा फ्रोझन मटारचा व्यवसाय ; कसा? ते घ्या जाणून

  डी बी रियलिटी (D B Realty) – 207 टक्के

  महाराष्ट्रातील डी बी रियल्टी या कंपनीच्या शेअर्सची किंमत यावर्षी 207 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या कंपनीचा एक शेअर 45 रुपये दरानं मिळत आहे. स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नीकडे डी बी रियल्टीचे 50 लाख शेअर्स आहेत. मिसेस झुनझुनवाला यांची कंपनीमध्ये 2.06 टक्के भागीदारी आहे. या स्टॉकची सध्याची किंमत 23 कोटी रुपये इतकी आहे.

  अनंत राज (Anant Raj) – 187 टक्के

  जवळपास 10 वर्षे सतत घसरण पाहिल्यानंतर 2021 मध्ये अनंत राजच्या शेअरची किंमत वाढली आहे. सध्या फर्मच्या एका शेअरची किंमत 74.95 रुपये इतकी आहे. बीएसईच्या (BSE) डेटानुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे अनंत राज फर्मचे 1 कोटी इक्विटी शेअर्स (Equity shares) आहेत. त्यामुळे झुनझुनवाला यांना फर्ममध्ये 3.39 टक्के स्टेक मिळाला असून त्याची किंमत 76.85 कोटी रुपये आहे.

  अॅपटेक (Aptech) – 129 टक्के

  राकेश झुनझुनवाला हे अॅपटेकचे प्रमोटर आहेत. झुनझुनवाला दाम्पत्याच्या नावे कंपनीत 96.68 लाख शेअर्स असून त्यामुळे त्यांना 24 टक्क्यांची भागीदारी मिळाली आहे. 2021 मध्ये अॅपटेकच्या शेअरमध्ये झपाट्यानं वाढ झाली. सध्या कंपनीच्या एका शेअरची किंमत 419 रुपये आहे. अॅपटेकमध्ये झुनझुनवाला यांची एकूण 346.28 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे.

  GST Annual Return भरण्याच्या अंतिम तारखेत मोठा बदल

  टार्क (TARC) – 109 टक्के

  रिअल इस्टेट फर्म असलेल्या टार्कचा स्टॉक यावर्षी दुपटीहून अधिक वाढला आहे. सध्या 49.25 रुपये प्रति समभागावर याचं ट्रेडिंग सुरू आहे. बीएसई डेटानुसार, राकेश झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 46.95 लाख इक्विटी शेअर्स आहेत. सध्याच्या बाजारभावानुसार या स्टेकची किंमत 23.12 कोटी रुपये आहे.

  एकूणच यावर्षी राकेश झुनझुनवालांनी गुंतवणुकींवर भरपूर नफा कमवला आहे. आता पुढील वर्षात झुनझुनवाला कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार याकडं किरकोळ गुंतवणूकदारांचं लक्ष लागलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Stock exchanges, Stock Markets