मराठी बातम्या /बातम्या /मनी /GST Annual Return भरण्याच्या अंतिम तारखेत मोठा बदल;आता या तारखेपर्यंत भरू शकता जीएसटी रिटर्न

GST Annual Return भरण्याच्या अंतिम तारखेत मोठा बदल;आता या तारखेपर्यंत भरू शकता जीएसटी रिटर्न

जर तुम्ही अद्याप जीएसटी रिटर्न भरला नसाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. केंद्र सरकारनं व्यवसायिकांना 2020-21 या आर्थिक वर्षासाठी वस्तू आणि सेवा कर   (GST)  अ‍ॅन्युअल रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवून दिली आहे.

जर तुम्ही अद्याप जीएसटी रिटर्न भरला नसाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. केंद्र सरकारनं व्यवसायिकांना 2020-21 या आर्थिक वर्षासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) अ‍ॅन्युअल रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवून दिली आहे.

जर तुम्ही अद्याप जीएसटी रिटर्न भरला नसाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. केंद्र सरकारनं व्यवसायिकांना 2020-21 या आर्थिक वर्षासाठी वस्तू आणि सेवा कर (GST) अ‍ॅन्युअल रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवून दिली आहे.

      मुंबई, 30 डिसेंबर-   जर तुम्ही अद्याप जीएसटी रिटर्न भरला नसाल तर तुमच्यासाठी एक खूशखबर आहे. केंद्र सरकारनं व्यवसायिकांना 2020-21 या आर्थिक वर्षासाठी वस्तू आणि सेवा कर   (GST)  अ‍ॅन्युअल रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढवून दिली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी जीएसटीआर 9   (GSTR 9)   आणि 9 सी भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021ऐवजी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळानं   (CBIC)   बुधवारी हा निर्णय जाहीर केला. सीबीआयसीनं एक ट्विट करून जीएसटीआर 9 (GSTR 9) आणि 9 सी भरण्याची अंतिम मुदत वाढल्याची माहिती दिली आहे.

    जीएसटीआर 9 हा वस्तू आणि सेवा करा (GST) अंतर्गत दरवर्षी भरला जाणारा वार्षिक रिटर्न   (annual return)   आहे. देशातील नोंदणीकृत करदात्यांना  (registered taxpayers)  दरवर्षी हा रिटर्न भरावा लागतो. विविध टॅक्स हेडअंतर्गत झालेल्या इनवर्ड आणि आउटवर्ड पुरवठ्यासंबंधित तपशीलांचा यामध्ये समावेश असतो. सरकारनं व्यावसायिकांना जीएसटीआर भरणं बंधनकारक केलेलं आहे. तो न भरल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.

    दरम्यान, येत्या शुक्रवारी (31 डिसेंबर 2021) वस्तू आणि सेवा कर (GST) काउन्सिलची एक बैठक होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  (Nirmala Sitharaman)   यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीमध्ये जीएसटी दर कमी करण्याविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. 12 आणि 18 टक्के जीएसटीचे दर एकत्र करून नवीन एकच दर निश्चित करण्यात होईल, अशी चर्चा आहे. अनेक दिवसांपासून हे दोन्ही टॅक्स स्लॅब (Tax slab) विलीन करण्याची मागणी होत आहे. केंद्रीय मंत्री मंडळाच्या एका गटानंही जीएसटी दर कमी करण्याबाबत आपला अहवाल जीएसटी काउन्सिलला (GST Council) सादर केला आहे. कर स्लॅबच्या विलीनीकरणासह शून्य जीएसटी असलेल्या काही उत्पादनांना कराच्या कक्षेत आणण्याच्या सूचना या अहवालात देण्यात आल्या आहे.

    (हे वाचा:जानेवारीत तब्बल 16 दिवस बंद राहणार बँका, लवकर पूर्ण करा महत्त्वाची कामं )

    केंद्र सरकारने 1 जानेवारी 22 पासून केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST) कायद्यातील डझनभर सुधारणा अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अप्रत्यक्ष कर व्यवस्था आणखी कडक होणार आहे. जीएसटी काउन्सिलच्या गेल्या बैठकीत, फुटवेअर आणि टेक्सटाईल क्षेत्रातील उत्पादनांसाठी जीएसटी दरांच्या स्लॅबमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.शुक्रवारी होणाऱ्या बैठकीपूर्वीच जीएसटीआर भरण्याची मुदत वाढवण्यात आल्यानं ज्यांनी अद्याप जीएसटीआर भरलेला नाही त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    First published:

    Tags: Government, GST, Money