मुंबई, 1 फेब्रुवारी : अर्थमंत्री निर्मला सीतारामन याच बजेट सादर करत आहे. त्यांनी कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामुळे कृषी, मत्स आणि त्यासोबतच्या उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. त्यात स्टार्टअपपासून मत्स्यव्यवसायापर्यंतच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांचा परिणाम सहाजिकच शेअर मार्केटवर झाला आहे. अर्थमंत्र्यांनी कृषी क्षेत्रासाठी घोषणा आणि योजना सांगितल्यानंतर कृषी क्षेत्राच्या शेअरमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अवंती फिड्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे उद्दिष्ट २० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर अॅग्री क्रेडिट सोसायटीचे डिजिटायझेशन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रावरील घोषणांमुळे या क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी कायम असल्याचं पाहायला मिळालं आहे. कृषी क्षेत्रासंदर्भात केलेल्या घोषणांचा परिणाम शेअरमध्ये दिसून येत आहे. कावेरी सीड्स, मंगलम सीड्समध्ये तेजीचा कल दिसून आली आहे. Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा कोणत्या? मत्स्यव्यवसायासंदर्भात केलेल्या घोषणांमुळे अवंती फीड्सच्या शेअरमध्ये सात टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. अर्थसंकल्पात मत्स्यव्यवसायासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. पीएम मत्स्य योजनेसाठी 6000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बँक बझारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदिल शेट्टी यांच्या मते, अर्थसंकल्पातील घोषणा कृषी आणि व्यवसाय या दोघांच्याही हिताची आहे आणि चांगल्या डिजिटायझेशनमुळे लोकांना कर्ज मिळणे सोपे होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.