नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य वधारले आहे, परिणामी देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत पुन्हा एकदा वधारली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे मुल्य (Gold Price Today) प्रति तोळा 240 रुपयांनी वाढले आहे. तर सोन्याबरोबरच एक किलोग्रॅम चांदीची किंमत देखील 786 रुपयांनी वाढली आहे. दरम्यान व्यापाऱ्यांच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर कमी झाले आहेत. तसंच किंमतींमध्ये या स्तरापासून मोठ्या तेजीची कोणतीही शक्यता नाही आहे. जर डॉलरचे मुल्य पुन्हा एकदा वधारले तर सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण होऊ शकते. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर शुक्रवारी 236 रुपये प्रति तोळाने वाढले होते. त्यानंतर शुक्रवारी सोन्याचे दर 51,558 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. सोन्याचे नवे दर (Gold Price on 12th October 2020) HDFC सिक्योरिटीजच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात सोमवारी सोन्याचे दर 240 रुपये प्रति तोळाने वधारले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे भाव वाढून 52,073 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. शुक्रवारी सोन्याचा व्यवहार 51,833 रुपये प्रति तोळावर बंद झाला होता. (हे वाचा- SBI अलर्ट! या तारखांना नाही वापरता येणार YONO SBI APP, बँकेने पाठवला मेसेज ) चांदीचे नवे दर (Silver Price on 12th October 2020) सोमवारी सोन्याबरोबरच चांदीचे दरही वधारले आहेत. आज चांदी 786 रुपयांनी महागली आहे. यानंतर चांदीचे दर 64,927 रुपये प्रति किलोग्रावर पोहोचले आहेत. शुक्रवारी चांदीचा व्यवहार 64,141 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला होता. (हे वाचा- आजपासून Discount दराने सोने खरेदीची संधी देत आहे सरकार, वाचा 10 महत्त्वाच्या गोष्टी) का वाढले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनिअर अनालिस्ट तपन पटेल यांच्या मते दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्धतेचया स्पॉट गोल्डची किंमत 240 रुपयांनी वाढली. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या वधारलेल्या मुल्यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







