मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जर तुम्ही भाडेकरू असाल तर जाणून घ्या हे कायदेशीर नियम, ठरतील फायदेशीर!

जर तुम्ही भाडेकरू असाल तर जाणून घ्या हे कायदेशीर नियम, ठरतील फायदेशीर!

भाड्याच्या घरात राहताना अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागते.

भाड्याच्या घरात राहताना अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागते.

भाड्याच्या घरात राहताना अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागते. कधी-कधी घरमालकाचा व्यवहारही चांगला नसतो. घरमालकाच्या अटी (Owner’s Conditions for Tenant) थोड्या जाचक असतात.

  मुंबई, 10 डिसेंबर : अनेकदा आपल्याला नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे घरांपासून दूर इतर शहरांमध्ये राहावं लागतं. अशावेळी आपण भाड्याच्या घरात (Tenant ) राहतो. बहुतेक जण शहरांमध्ये येतात आणि तेथे भाड्याने घर घेऊन राहतात. भाड्याने राहण्यात स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. भाड्याच्या घरात राहताना अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागते. कधी-कधी घरमालकाचा व्यवहारही चांगला नसतो. घरमालकाच्या अटी (Owner’s Conditions for Tenant) थोड्या जाचक असतात. अनेक भाडेकरू आपल्या घरमालकच्या वागण्याने त्रासलेले असतात. धावपळीच्या जीवनातून वेळ काढत दुसरे घर शोधण्याच्या सहसा कोणी प्रयत्न करत नाही. घरमालकच्या मर्जीने वागतात. पण तुम्हाला माहिती नसेल, भाडेकरूचे शोषण होऊ नये म्हणून आपल्या कायद्यामध्ये भाडेकरूला ( Tenant Rights) काही अधिकार देण्यात आलेले आहेत. याअंतर्गत भाडेकरू आणि घरमालक दोघांचे अधिकार (Tenant Rights And Duties) अधोरेखित करण्यात आलेले आहेत.जर तुम्हीही भाड्याच्या घरात राहात असाल. तर हे नियम (law for tenants) काय आहेत ते जाणून घ्या..

  हक्क आणि कर्तव्ये यासंदर्भात भाडेकरू आणि घरमालक यांच्यात करार (Agreement) आवश्यक आहे. या करारामध्ये सर्व अटी नमूद कराव्यात. जेणेकरून नंतर कोणतीही अडचण येणार नाही. कोणत्याही कायदेशीर कारवाईच्या बाबतीत, करार हा महत्वाची भूमिका बजावतो. याबाबतचं वृत्त `टीव्ही 9 हिंदी`ने दिलं आहे.

  भाडेकरूचा घरमालकाच्या संपत्तीवर कोणताही हक्क नसतो. घरमालकाच्या मालमत्तेवर भाडेकरू दावा करू शकत नाही. मालमत्ता हस्तांतरण (Transfer of Property) कायद्यानुसार, ॲड्व्हर्स पझेशनमध्ये (Adverse Possession) असे नसते. यात ज्या व्यक्तींचा मालमत्तेवर ताबा असतो. ती मालमत्ता विकण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला असतो. म्हणजेच व्यक्तीने एखाद्या मालमत्तेवर 12 वर्षे ॲडव्हर्स पझेशन ठेवलं तर त्याला मालमत्तेवर हक्क मिळतो.

  48 वर्षांच्या Malaika Arora ने केलं असं Bold फोटोशूट, की...

  घराचे नूतनीकरण करायचे असेल, किंवा घर खाली करायचे असेल, तर घरमालकाने भाडेकरूला प्रथम नोटीस (Notice) दिली पाहिजे. अनेकदा घरमालक भाडेकरूच्या घरी अचानक भेट देतात. मात्र, हे चुकीचे आहे. घरमालकाने घरी जाण्यापूर्वी भाडेकरूला 24 तास अगोदर कळवणे आवश्यक आहे. तसंच घरमालक फक्त दिवसाच भाडेकरूच्या घरात प्रवेश करू शकतो. यासोबतच भाडेकरू आणि घरमालक यांच्यात कोणत्याही विषयावरून वाद झाला, तर घरमालक भाडेकरूचे पाणी आणि वीज बंद (Water and electricity) करू शकत नाही.

  अनेकदा घरमालक भाडेकरूकडून भाडे अ‍ॅडव्हान्स म्हणून घेतात. मात्र यासंदर्भात काही नियम आहेत. घरमालक एकदाच अनेक महिन्यांचे जास्तीचं भाडे अ‍ॅडव्हान्स म्हणून घेऊ शकत नाही. तसेच घराचे नूतनीकरण केल्यानंतर घरमालक भाडे वाढवू शकतो. याचबरोबर भाडेकरूकडून घरमालक डिपॉझिटही ३ महिन्यांपेक्षा जास्त महिन्यांचं भाडं घेऊ शकत नाही.

  पृथ्वीच्या जीवसृष्टीचे रक्षण करणाऱ्या एका महाकाय 'कवचा'चा शोध!

  एखादी व्यक्ती मालमत्ता भाड्याने घेते. तेव्हा भाडेकरू आणि मालक दोघेही त्या मालमत्तेसाठी जबाबदार असतात. भाडेकरू घरमालकाच्या परवानगीशिवाय कोणतीही भिंत पाडू शकत नाही. तसेच घऱमालकही भाडेकरूच्या संमतीशिवाय मालमत्तेत कोणतेही बदल करू शकत नाही. यात घरमालक आणि भाडेकरूने करार केला असेल तर त्यातील अटी याला अपवाद ठरतात.

  First published: