मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे ही योजना... गुंतवणुकीवर देते चांगला रिटर्न!

ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे ही योजना... गुंतवणुकीवर देते चांगला रिटर्न!

ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर गुंतवणूक

ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर गुंतवणूक

पंतप्रधान वय वंदना योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर वर्षाला 7.4% व्याज मिळतं. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे यात एकरकमी 15 लाख रुपये गुंतवू शकतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 नोव्हेंबर: केंद्र सरकार विवाहितांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंतप्रधान वयवंदना योजना राबवतं. ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देण्यासाठी राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पती-पत्नीने गुंतवणूक करणं गरजेचं आहे. रिटायरमेंट अर्थात निवृत्तीनंतर तुम्हाला 18500 रुपये पेन्शन मिळते.

पती-पत्नीला मिळणार 18500 रुपये

ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देण्याच्या हेतूने केंद्र सरकारने 4 मे 2017 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे गरजू ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मिळावी हाच या मागचा उद्देश. एलआयसी अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे ही योजना सरकारसाठी चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत 7.50 लाख रुपये गुंतवणूक करता यायची, पण आता गुंतवणुकीची रक्कम 15 लाख इतकी झाली आहे.

हेही वाचा - शेवटचा चान्स! आधार कार्डशी त्वरित लिंक करा पॅनकार्ड, नाहीतर होईल मोठा दंड

गुंतवणुकीवर मिळतं वर्षाला 7.4% व्याज

पंतप्रधान वय वंदना योजनेअंतर्गत गुंतवणुकीवर वर्षाला 7.4% व्याज मिळतं. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे यात एकरकमी 15 लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेचा लाभ पती-पत्नी दोघांनाही मिळतो. यासाठी दोघंही या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत दोघांनी प्रत्येकी 15 लाख रुपये गुंतवले तर त्यांना 18500 रुपये पेन्शन मिळते. परंतु, पती किंवा पत्नी यापैकी कुणी एकानेच 15 लाख रुपये गुंतवले तर मिळणार्‍या पेन्शनची रक्कम ही दरमहा 9250 रुपये इतकी असेल.

हेही वाचा - पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवा पैसे, व्याजावरच भागेल खर्च

15 लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा 9250 मिळतं पेन्शन

या योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक एकरकमी 15 लाख रुपये गुंतवू शकतात. ही गुंतवणूक तुम्हाला 31 मार्च 2023 च्या पूर्वी करणं आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या प्रमाणात तुम्हाला मिळणारं पेन्शन हे प्रतिमहिना 1000 रुपयांपासून 9250 रुपयांपर्यंत मिळतं. तुम्ही कमीतकमी 1.50 लाख रुपये गुंतवलेत तर तुम्हाला प्रतिमहिना केवळ 1000 रुपयेच मिळतील. परंतु, तुम्ही जर 15 लाखांची गुंतवणूक केलीत तर प्रतिमहिना 9250 रुपये इतकं पेन्शन मिळेल. पती-पत्नीने मिळून गुंतवणूक करायचे ठरवल्यास तुम्हाला 30 लाख रूपये गुंतवावे लागतील. अशाप्रकारे दोघांना प्रत्येक महिन्याला 18500 रुपये पेन्शन मिळेल.

केंद्र सरकारतर्फे राबवली जाणारी ही योजना 2017 पासून सुरू आहे. परंतु, अनेकदा आपल्याला या सरकारी योजनांची पुरेशी माहिती नसते. ती माहिती मिळाल्यास नागरिक गुंतवणूक करू शकतात. सरकारची योजना म्हणजे सुरक्षिततेची हमी असते त्यामुळे नागरिक या योजनांचा लाभ घेतात.

First published:

Tags: Pension, Pension scheme