मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Life Insurance Policy घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच, होईल फायदा

Life Insurance Policy घेताना या गोष्टी लक्षात ठेवाच, होईल फायदा

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच काही गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे.

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच काही गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे.

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच काही गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे.

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : सध्या लाइफ इन्शुरन्स पॉलिसीकडे अनेकांचा वाढता कल आहेत. परंतु लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना काही गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे. अनेक जण एजंटने सांगितल्यानुसार पॉलिसी घेतात. मात्र जेव्हा क्लेमचा प्रश्न येतो तेव्हा अनेक अटी आपल्यासमोर उभ्या राहतात किंवा मग खरेदी केलेली पॉलिसी तुम्हाला इच्छित रिटर्न्स देण्यास सक्षम नसते, अशी परिस्थिती अनेकांसमोर येते. त्यामुळे पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच काही गोष्टींचा बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे.

पॉलिसीचा खरेदीदार -

पॉलिसी एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे, की स्टँडर्ड टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसी (term life insurance policy) सर्व विमाधारकांसाठी सारखीच असते. कोणत्याही जीवन विमा पॉलिसीमध्ये खरेदीदार हा पहिला आणि सर्वांत महत्त्वाचा घटक असतो.

पहिल्या वर्षी टर्म प्लॅन्समध्ये आत्महत्या वगळता इतर कोणत्याही कारणामुळे होणारा मृत्यू कव्हर (पॉलिसीचे लाभ देण्यास योग्य) केला जातो. विमाधारकाचा (Policy Holder) मृत्यू झाल्यास नॉमिनी (वारसदार) व्यक्तीला एकरकमी लाभ दिला जातो. बहुतेक वेळा टर्म प्लॅन्सची शिफारस केली जाते. काही रेग्युलर टर्म प्लॅन्समध्ये बिल्ट इन फीचरच्या रूपात टर्मिनल इलनेससाठी देखील (terminal illness) आर्थिक मदत मिळते.

म्युच्युअल फंडाची निवड कशी करावी? गुंतवणुकीआधी नेमकं काय करावं?

गरजेनुसार पॉलिसी -

टर्म प्लॅनचे विविध वैशिष्ट्यांच्या आधारे डिझाइन केलेले अनेक प्रकार आहेत. यामुळे ग्राहक त्यांच्या गरजेनुसार पॉलिसी निवडू शकतात. उदाहरणार्थ, नॉमिनीला आर्थिक बाबींची माहिती नसल्यास, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर मिळणारी रक्कम एकदाच घेण्याऐवजी मासिक हप्त्यांमध्येही घेता येते. काही प्लॅनमध्ये वेगवेगळ्या प्रीमियम पेमेंटच्या पर्यायांद्वारे विविध सुविधा दिल्या जातात. यामध्ये प्रीमियमचा परतावा किंवा मर्यादित प्रीमियम मुदतीच्या पर्यायांचा समावेश होतो.

IPO निवडताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, होणार नाही नुकसान

टर्म इन्शुरन्सवर द्या लक्ष -

आपल्यापैकी बहुतेकांना लाइफ इन्शुरन्स ही एक गुंतवणूक किंवा बचत योजना वाटते. काहींना टर्म इन्शुरन्स हा पैशाचा अपव्यय वाटतो. तज्ज्ञांच्या मते हे दोन्ही प्रकारचे विचार चुकीचे आहेत. कारण लाइफ इन्शुरन्स हा तुमच्यासाठी नाही, तर तुमच्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठी खरेदी केला जातो.

इन्शुरन्स कोणत्या कंपनीचा घ्यावा? 

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना कंपनीचा क्लेम रेशो (Claim ratio) पाहणं गरजेचं आहे. तुम्ही टर्म प्लॅन खरेदी करत असाल, तर क्लेम रेशो 95 टक्के असलेल्या कंपन्यांना प्राधान्य द्या. तुम्ही कोणत्याही इन्शुरन्स अॅग्रिगेटर साइटवर कंपन्याची माहिती सहजपणे पडताळून पाहू शकता.

Savings Vs Current | सेव्हिंग अकाउंट की करंट अकाउंट तुमच्या फायद्याचं कोणतं?

दोन कंपन्यांची पॉलिसी -

तुम्हाला जास्त प्रमाणात विमा संरक्षण रक्कम मिळवायची असेल, तर दोन वेगवेगळ्या कंपन्यांची पॉलिसी घेतली पाहिजे. याचे दोन फायदे आहेत. विमा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, कुटुंबातले सदस्य नुकसानभरपाईचा दावा करतात. काही कारणास्तव एका विमा कंपनीनं दावा नाकारला, तर दुसरी विमा कंपनी दावा मंजूर करेल याची शाश्वती असते. याशिवाय, काही वर्षांनी विम्याची गरज कमी झाल्यास एक पॉलिसी सरेंडर करून दुसरी पॉलिसी सुरू ठेवता येते.

First published:

Tags: Insurance, Money