मराठी बातम्या /बातम्या /मनी /Penny Stock मध्ये गुंतवणूक करताना खबरदारी घ्या; पैसे बुडण्याची शक्यताही जास्त, तज्ज्ञ काय सांगतात?

Penny Stock मध्ये गुंतवणूक करताना खबरदारी घ्या; पैसे बुडण्याची शक्यताही जास्त, तज्ज्ञ काय सांगतात?

 पेनी स्टॉक्स असे आहेत जे कमी किमतीत ट्रेड करतात. पेनी स्टॉकची मार्केट कॅप खूपच कमी असते. स्मॉल कॅप्स प्रमाणे, पेनी स्टॉकला अनेकदा नॅनो किंवा मायक्रो-कॅप स्टॉक म्हणतात. मोठ्या मार्केट कॅप कंपन्यांच्या तुलनेत या शेअरबद्दल फारशी माहिती गुंतवणूकदारांना नसते.

पेनी स्टॉक्स असे आहेत जे कमी किमतीत ट्रेड करतात. पेनी स्टॉकची मार्केट कॅप खूपच कमी असते. स्मॉल कॅप्स प्रमाणे, पेनी स्टॉकला अनेकदा नॅनो किंवा मायक्रो-कॅप स्टॉक म्हणतात. मोठ्या मार्केट कॅप कंपन्यांच्या तुलनेत या शेअरबद्दल फारशी माहिती गुंतवणूकदारांना नसते.

पेनी स्टॉक्स असे आहेत जे कमी किमतीत ट्रेड करतात. पेनी स्टॉकची मार्केट कॅप खूपच कमी असते. स्मॉल कॅप्स प्रमाणे, पेनी स्टॉकला अनेकदा नॅनो किंवा मायक्रो-कॅप स्टॉक म्हणतात. मोठ्या मार्केट कॅप कंपन्यांच्या तुलनेत या शेअरबद्दल फारशी माहिती गुंतवणूकदारांना नसते.

पुढे वाचा ...

मुंबई, 29 डिसेंबर : पेनी स्टॉक म्हणजे (What is penny stocck) कमी वेळेत पेसै दुप्पट करण्याचा फॉर्मुला, असं अनेकांना वाटतं. त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणूकदार (Share market investors) अनेकदा मल्टीबॅगर स्टॉकच्या (Multibagger stock) शोधात असतात. लोक पेनी-स्टॉकमध्ये पैसे गुंतवतात. पण नेहमीच पेनी स्टॉकमुळे तुम्हाला फायदा होईल असं नाही. कारण अनेकदा पेनी स्टॉकमुळे मोठं नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी चहूबाजूने विचार करुन गुंतवणूक केली पाहिजे. पैसे बुडवणाऱ्या स्टॉकची चर्चा कमी आणि पैसे कमवणाऱ्या स्टॉकचीच चर्चा जास्त असेत. त्यामुळे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल जाणून घेऊया.

मल्टीबॅगर पेनी स्टॉक्स म्हणजे काय?

नावाप्रमाणेच, पेनी स्टॉक्स असे आहेत जे कमी किमतीत ट्रेड करतात. पेनी स्टॉकची मार्केट कॅप (Low Market Cap Share) खूपच कमी असते. स्मॉल कॅप्स प्रमाणे, पेनी स्टॉकला अनेकदा नॅनो किंवा मायक्रो-कॅप स्टॉक म्हणतात. मोठ्या मार्केट कॅप कंपन्यांच्या तुलनेत या शेअरबद्दल फारशी माहिती गुंतवणूकदारांना नसते. या शेअरमध्ये लिक्विडिटी खूपच कमी असते. अमेरिके संदर्भात, जर स्टॉक 5 डॉलरच्या खाली आणि काही प्रकरणांमध्ये 1 डॉलरच्या खाली ट्रेड करत असेल तर तो पेनी स्टॉक मानला जातो. भारतात शेअरची किंमत 10 रुपयांच्या खाली असेल आणि मार्केट कॅप कमी असेल तर तो सामान्यतः पेनी स्टॉक मानला जातो.

Multibagger Stock : कंपनीची कमाई शुन्य पण गुंतवणूकदार मालामाल; 21 दिवसात 200 टक्के नफा

ऑपरेट करणे सोपे

पेनी स्टॉकची किंमत खूप कमी आहे, त्यामुळे काही श्रीमंत लोक एकत्र येऊन स्वतःच्या किंमतीनुसार त्याची किंमत कमी किंवा जास्त करू शकतात. स्टॉक ऑपरेट करण्यापूर्वी, हे लोक स्वत:च्या शेअर्समध्ये पैसे गुंतवून त्याची किंमत वाढवतात. जेव्हा लोक चांगला परतावा पाहतात आणि या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, तेव्हा किमती आणखी वाढतात, त्यानंतर स्टॉकचे ऑपरेटर त्यांच्या नफ्यासह बाहेर पडतात.

सर्वात मोठा धोका

अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किटमध्ये गुंतलेल्या अशा पेनी स्टॉकमध्ये अजिबात गुंतवणूक करू नका. अशा शेअर्समध्ये एकदा पैसे गुंतवले की ते विकणे कठीण होते. अशा परिस्थितीत लोअर सर्किट सतत सुरू राहिल्यास मोठे नुकसान सहन करावे लागते.

संपूर्ण तपशील मिळवा

सर्व पेनी स्टॉक्स खराब आहेत असे नाही. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीबद्दल नीट जाणून घ्या, तिचा व्यवसाय काय आहे, भविष्यातील योजना काय आहेत, मार्केट कॅप किती आहे, नफा-तोटा किती होत आहे. त्या कंपनीचे भविष्य पाहूनच त्यात पैसे गुंतवा.

यंदाचं वर्ष IPO नी गाजवलं, पुढील वर्षातही सज्ज; यावेळी गुंतवणुकीची संधी हुकवू नका, वाचा सविस्तर

मोहात पडू नका

स्वस्त स्टॉक असेल तर कमी पैशात जास्त शेअर्स मिळतील हे पाहून पेनी स्टॉकमध्ये कधीही गुंतवणूक करू नका. ज्या स्टॉकची किंमत हजारोंमध्ये असली तरीही चांगला परतावा देत असलेल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करा. जर तुम्ही पेनी स्टॉकमध्ये ट्रेडिंग करत असाल तर जास्त लोभी होऊ नका. जर तुम्ही विचार केला असेल तेवढे पैसे मिळाले असतील तर ताबडतोब प्रॉफिट बूक करुन बाहेर पडा. अन्यथा तुम्ही लोभात राहिल्यास तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल.

काही पेनी स्टॉक किमतीतील अस्थिरतेमुळे किंवा इतर कारणांमुळे बाजार नियामकांच्या छाननीखाली येतात. म्हणून, त्यांच्यामध्ये तीव्र घट आहे किंवा त्यांच्यावर बंदी देखील आहे. एकंदरीत, बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की त्यांच्या भांडवलाचा फार कमी भाग अशा शेअरमध्ये गुंतवावा. जेणेकरून पैसे अडकले तरी फारसे नुकसान होणार नाही.

First published:

Tags: Investment, Money, Share market