मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Multibagger Stock : कंपनीची कमाई शुन्य पण गुंतवणूकदार मालामाल; 21 दिवसात 200 टक्के नफा

Multibagger Stock : कंपनीची कमाई शुन्य पण गुंतवणूकदार मालामाल; 21 दिवसात 200 टक्के नफा

Vegetable Products Ltd  हा स्मॉलकॅप स्टॉक गेल्या एका वर्षात 985 टक्के वाढला आहे. गेल्या वर्षी 28 डिसेंबर 2020 रोजी या शेअरची किंमत 2 रुपये होती. 28 डिसेंबर 2021 रोजी त्याची किंमत 21.17 रुपये होती.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 डिसेंबर : खाद्यतेल उत्पादन करणारी कंपनी व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स लि च्या (Vegetable Products Ltd) शेअरमध्ये मागील केवळ 21 दिवसांत 200 टक्क्यांहून अधिकची वाढ नोंदवली गेली आहे. मात्र 2020-21 या आर्थिक वर्षात या कंपनीचा महसूल शून्य होता. जर वर्षभराबद्दल बोलायचे तर हा पेनी स्टॉक (Penny Stock) 1000 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.

बेंचमार्क निर्देशांक (Benchmark Index) सध्या एका श्रेणीत ट्रेड करत आहेत. कोरोनाचा नवीन वेरिएंट ओमिक्रॉनची (Omicron) भीती कायम असल्याने बहुतांश मोठ्या शेअरवरही काही काळापासून दबाव आहे. अशा परिस्थितीत, ज्यांचे बाजार भांडवल कमी आहे अशा पेनी स्टॉक्सकडे गुंतवणूकदारांचे आकर्षण अधिक झाले आहे. कमी व्हॉल्यूममध्ये व्यवहार होणारे शेअर्स लोकांना खूप आवडतात आणि या सगळ्यांवर सोशल मीडियावर पेनी मल्टीबॅगर स्टॉकचा (Multibagger Stocks) आवाज लोकांना भुरळ घालत आहे.

यंदाचं वर्ष IPO नी गाजवलं, पुढील वर्षातही सज्ज; यावेळी गुंतवणुकीची संधी हुकवू नका, वाचा सविस्तर

Vegetable Products Ltd चा ट्रॅक रेकॉर्ड

हा स्मॉलकॅप स्टॉक (Smallcap Share) गेल्या एका वर्षात 985 टक्के वाढला आहे. गेल्या वर्षी 28 डिसेंबर 2020 रोजी या शेअरची किंमत 2 रुपये होती. 28 डिसेंबर 2021 रोजी त्याची किंमत 21.17 रुपये होती. जर तुम्ही त्याची बेंचमार्क बीएसईशी तुलना केली तर ही वाढ खूपच जास्त आहे. बीएसईने एका वर्षात सुमारे 22 टक्के वाढ दर्शवली आहे.

जर आपण 2021 बद्दलच बोलायचे तर हा स्टॉक 832 टक्के वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत 476 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आणि गेल्या एका महिन्यातच त्यात 204 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र दीर्घकालीन दृष्टीकोनातूनही पाहिल्यास, गेल्या 5 वर्षांत हा स्टॉक 340 टक्क्यांनी वाढला आहे. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 231.18 कोटी रुपये आहे.

नवीन वर्षात 4 स्टॉक्स पोर्टफोलिओत सामील केले जाऊ शकतात; सध्या स्वस्तात उपलब्ध

कंपनीची देणेदारी जास्त

25 नोव्हेंबर 2021 नंतर हा स्टॉक अचानक वाढू लागला. मात्र, या स्टॉकमध्ये पैसे ठेवणे धोक्याचे वाटत होते, कारण त्याची बुक वॅल्यू नकारात्मक (negative book value) होती. कंपनीने 2020-21 या आर्थिक वर्षात 15.60 लाख रुपयांचा तोटा दाखवला होता आणि जुलै 2011 पासून कंपनीने उत्पादन बंद केल्यामुळे त्याच वर्षी कंपनीची उलाढाल शून्य होती.

First published:

Tags: Investment, Money, Share market