मुंबई, 13 सप्टेंबर : नवीन पॅनकार्ड तयार करणे अगदी सोपं बनलं आहे. त्यामुळे अनेकांकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्याचंही दिसून येतं. तुमच्याकडेही एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील किंवा तुम्ही दुसरे पॅन कार्ड बनवण्याचा विचार करत असाल तर असे करण्यापूर्वी पॅनकार्डशी संबंधित सर्व गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. एक व्यक्ती एकापेक्षा जास्त पॅनकार्ड ठेवू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला पॅन वाटप केले असेल तर तो दुसरा पॅन मिळवण्यासाठी अर्ज करू शकत नाही. असे आढळल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. आयकर कायदा 1961 च्या कलम 139A अंतर्गत, एखादी व्यक्ती फक्त एकच पॅनकार्ड ठेवू शकते. इन्कम टॅक्स इंडियाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, एकापेक्षा जास्त पॅन धारण केल्यास आयकर कायदा, 1961 च्या कलम 272B अंतर्गत 10,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त पॅन वाटप केले गेले असेल तर त्याने ताबडतोब अतिरिक्त पॅन कार्ड सरेंडर केले पाहिजे. #कायद्याचंबोला: ऑनलाईन मागवलेला TV निघाला डॅमेज, नाशिकच्या तरुणाने कायद्याच्या मदतीने पूर्ण रक्कम 10 टक्के व्याजाने केली वसूल अतिरिक्त पॅन कसे सरेंडर करावे? ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे सरेंडर करण्यासाठी अतिरिक्त पॅन अर्ज केला जाऊ शकतो. ऑनलाइन सरेंडर करण्यासाठी, आयकर वेबसाइटवर जा आणि ‘सरेंडर डुप्लिकेट पॅन’ पर्यायावर क्लिक करा. येथे डुप्लिकेट पॅन क्रमांकासह तुमचे वैयक्तिक तपशील भरा. त्यानंतर सबमिट बटण दाबा.
कर सवलतीचे पैसे तुमच्याकडून पुन्हा वसूल केले जाऊ शकतात, Income Tax बाबत हा नियम समजून घ्या
पॅन ऑफलाइन सरेंडर करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आयकर मूल्यांकन अधिकाऱ्याला पत्र लिहावे लागेल. यामध्ये तुमचा पर्सनल डिटेल्स, पॅन कार्ड नंबर आणि डुप्लिकेट पॅन कार्ड डिटेल्स ठेवण्याची माहिती द्यावी लागेल. तुम्ही पोचपावती पोस्टाने मिळवू शकता किंवा तुमच्या जवळच्या आयकर कार्यालयात स्वत: जमा करून घेऊ शकता. पावती म्हणजे तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड रद्द झाल्याचा पुरावा आहे. तुमचे पॅन कार्ड हरवले तर काय करावे? जुने पॅन हरवला असल्यास, दुसरा पॅन नवा बनवण्याऐवजी, डुप्लिकेट पॅन बनवा. तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक आठवत नसेल, तर आयकर विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन तुमची पॅन माहिती मिळवता येईल. यामध्ये नाव, वडिलांचे नाव आणि जन्मतारीख देऊन पॅन माहिती मिळवता येते. एकदा पॅन माहिती प्राप्त झाल्यानंतर, डुप्लिकेट पॅनसाठी अर्ज केला जाऊ शकतो.