मुंबई, 13 सप्टेंबर : आयकर नियमानुसार नागरिकांना विविध मार्गांनी करसवतीचा लाभ घेता येतो. मात्र जर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80-सी अंतर्गत चुकीच्या पद्धतीने कर सूट घेत असाल तर सावध रहा. सरकार तुमच्याकडून हे पैसे परत देखील घेऊ शकते. त्यामुळे तुम्हाला कोणत्या नियमांमुळे तुमची बचत काढता येईल याची माहिती असणे महत्त्वाचे आहे. मनीकंट्रोलमधील एका लेखानुसार, Tax2Winचे सह-संस्थापक अभिषेक सोनी, म्हणतात की कर सवलतीला काही अटी संलग्न आहेत आणि एखादी व्यक्ती या अटींची पूर्तता केली तरच कर कपातीचा दावा करू शकते. जर व्यक्तीने अटींची पूर्तता केली नाही, तर मागील आर्थिक वर्षातील त्याची वजा केलेली रक्कम पुढील आर्थिक वर्षातील उत्पन्न म्हणून गणली जाईल. पुण्यातील रुपी बँकेला 22 सप्टेंबरला लागणार कायमचा टाळा! ग्राहकांचे पैसे मिळणार का? कोणत्या अटी विचारात घ्याव्यात? तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवणूक करत असाल आणि त्याच्या आधारे कपातीचा दावा केला तर लक्षात ठेवा की तुम्ही त्या योजनेतून मुदतपूर्व पैसे काढलेले नाहीत. जर तुम्ही तसे केले असेल तर त्याचा तुमच्या वजावटीवर परिणाम होईल. या व्यतिरिक्त, ज्या योजनेवर तुम्ही वजावटीचा दावा करत आहात त्या योजनेचे विहित वेळेपूर्वी हस्तांतरण करण्याचा परिणाम देखील वजावटीवर होईल. याचा अर्थ असा की जर तुम्ही योजनेत गुंतवणूक करणे थांबवले, मुदतपूर्व पैसे काढले किंवा बरेच काही मुदतपूर्व ट्रान्सफर केले तर तुमच्या कर सवलतीवर परिणाम होईल. विमा पॉलिसी काही लोक कर सवलतीचा फायदा घेण्यासाठी मार्चमध्ये रिटर्न भरण्याच्या एक महिना आधी विमा पॉलिसी घेतात. पण इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर तुम्ही सामान्य जीवन विमा पॉलिसी घेतली आणि 2 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यानंतर ती बंद केली, तर कर कपात काढून घेतली जाईल. सध्या, 80-C अंतर्गत, केवळ अशा जीवन विमा पॉलिसी उपलब्ध आहेत ज्यांचे प्रीमियम पॉलिसीच्या विमा रकमेच्या 10 टक्के आहे. जर प्रीमियम 10% पेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला मॅच्युरिटीनंतर मिळालेल्या रकमेवर कर भरावा लागेल. विद्यार्थ्यांना शिकता-शिकता पैसे कमावण्याची संधी; घसबसल्या एक-दोन तास द्या अन् 25-30 हजार सहज कमवा मालमत्तेच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला गृहकर्जाच्या मुद्दलावर 80-सी अंतर्गत सूट मिळते, परंतु जर तुम्ही घर खरेदीच्या 5 वर्षांच्या आत विकले तर तुम्हाला मिळणारी कर सूट काढून घेतली जाईल आणि तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स देखील भरावा लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.