नवी दिल्ली, 22 सप्टेंबर: आयकर विवरणपत्र भरण्याची (Income tax return file) शेवटची तारीख (itr filing last date) 31 डिसेंबर 2021 आहे. जर तुम्ही ही मुदत चुकवली तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. मात्र असे काही करदाते आहेत जे मुदत संपल्यानंतरही कोणताही दंड न घेता आपला आयटीआर दाखल करू शकतात. जाणून घ्या हे कोणते टॅक्सपेयर्स आहेत ज्यांना सूट मिळेल.
द्यावा लागणार 5000 रुपयांचा दंड
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) आर्थिक वर्ष 2020-21 साठी ITR भरण्याची मुदत पुन्हा एकदा 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे. 31 डिसेंबरनंतर आयटीआर दाखल केल्यास 5 हजार रुपये दंड आकारला जाईल. इन्कम टॅक्सच्या सेक्शन 234F मध्ये याबाबत नमुद करण्यात आले आहे. दरम्यान जर करदात्याचे उत्पन्न 5 लाख रुपयांच्या आत असेल तर उशीरा आयटीआर भरल्याचा दंड म्हणून 1,000 रुपये देण्याचा नियम आहे. 5 लाखांपेक्षा जास्त कमाई केल्यास दंडाची रक्कम वाढेल.
हे वाचा-सोनेखरेदीची सुवर्णसंधी! रेकॉर्ड लेव्हलपेक्षा 10000 रुपयांनी स्वस्त मिळतंय सोनं
कुणाला भरावा लागणार नाही दंड?
ज्यांचे एकूण उत्पन्न (Gross Total Income) मूलभूत सूट मर्यादेपेक्षा जास्त नाही, त्यांना आयटीआर दाखल करण्यास विलंब झाल्यास दंड आकारला जाणार नाही. जर ग्रॉस टोटल इन्कम सवलतीच्या मुलभूत मर्यादेपेक्षा कमी असेल तर उशिरा रिटर्न भरण्यासाठी कलम 234F अंतर्गत दंड आकारला जाणार नाही.
काय आहे बिलेटेड रिटर्न?
आयटीआर फाइल करण्याच्या तारखेनंतर जर एखाद्या करदात्याने रिटर्न फाइल केला तर त्याला बिलेटेड रिटर्न असं म्हणतात. हा आयकर कायद्याच्या कलम 139(4) अंतर्गत येतो. या कलमाअंतर्गत कोणताही टॅक्सपेयर आधीचा रिटर्न फाइल करू शकतो.
हे वाचा-Petrol Price Today: पेट्रोलचे दर शंभरीपार! मुंबईत काय आहे आजचा भाव?
बिलेटेड रिटर्नवर कलम 234F अंतर्गत दंड आकारला जातो. या कलमानुसार, डेडलाइननंतर आणि 31 डिसेंबरपूर्वी ITR दाखल करण्यासाठी 5,000 रुपये दंड आहे. तुम्ही आणखी विलंब केल्यास दंडाची रक्कम 10,000 रुपयांपर्यंत वाढते. मात्र जर करदात्याचे एकूण उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल तर उशीरा ITR भरण्यासाठी शुल्क 1,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax