मुंबई : बचत खात्यातली रक्कम काढायची असेल, पैसे खात्यात जमा करायचे असतील किंवा मुदत ठेव जमा करणं, काढणं आदी कारणांसाठी बँकेत दररोज नागरिकांची गर्दी होत असते. खातेदारांची संख्या खूप असल्याने खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँकांमध्ये तर छोट्याशा कामासाठीही बराच वेळ ताटकळत राहावं लागतं. अशा वेळी ज्येष्ठ नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन 70 वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘बँक आपल्या दारी’ ही योजना राबवली जाणार आहे. सरकारच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांना बेसिक बँकिंग सेवा त्यांच्या घरी देण्याची तयारी केली जात आहे.
लीज-रेंट अॅग्रीमेंटमधला फरक माहिती आहे का? कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी घ्या पुरेशी काळजी
अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा वित्त सेवा विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसमार्फत बँकर्ससाठी नवीन नियम आणण्याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. बँक आपल्या दारी ही योजना फक्त ज्येष्ठांसाठी नव्हे, तर दिव्यांगांसाठीही उपलब्ध केली जाईल. या सेवेचा लाभ घ्यायचा असल्यास अत्यंत कमी शुल्क आकारलं जाईल व या सुविधेचा फायदा घ्यायचा असल्यास एक सार्वत्रिक म्हणजेच युनिव्हर्सल नंबर लाँच करण्यात येणार आहे.
आरबीआयने या आधी दोन वेळा ‘बँकिंग सेवा आपल्या दारी’ ही सेवा सुरू करण्याबाबत आदेश काढले आहेत. यात बँकांना पहिल्यांदा 31 डिसेंबर 2017 व दुसऱ्यांदा 30 एप्रिल 2020 पर्यंतची डेडलाइन दिली होती. परंतु ‘बँकिंग आपल्या दारी’ ही सेवा पूर्ण देशात आतापर्यंत सुरू झालेली नाही.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी VPF बेस्ट पर्याय; 8 टक्क्यांपर्यंत मिळतंय व्याज, कसं उघडावं खातं?आता नवीन सूचना काढत एका ठरावीक कालमर्यादेत ही सेवा सुरू करण्याचा सरकारकडून विचार आहे. बँक आपल्या दारी या सेवेअंतर्गत खातं उघडणं, फिक्स डिपॉझिट, पेन्शन सेवा, विमा, गुंतवणूक आणि कर्ज यांसारख्या सुविधा दिल्या जाणार आहेत. ज्या बँक शाखांची यात निवड केली जाईल, त्यांना सेवा देणं बंधनकारक राहिल. यानंतर दुसऱ्या शाखाही या सेवेशी जोडल्या जाणार आहेत. इंडियन बँक असोसिएशनने डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेससोबत एकत्र येऊन ‘न्यू बँकर्स गाइड’चा मसुदा तयार केला आहे. याचा आदेश काढण्याआधी त्याला दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणारे मुख्य आयुक्त म्हणजेच चीफ कमिशनर फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी यांच्यासमोर ठेवण्यात येईल. जून महिन्यातच डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसने आरबीआय, पीएफआरडीए, ओरिएंटल इन्शुरन्स, एलआयसी आणि आयबीएच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. या बैठकीत 2017 चं बँकर्स गाइड अपडेट करण्यास सांगितलं गेलं होतं.
हा स्टॉक निघाला कुबेराचा खजाना! तुम्ही घेतला नसेल तर कराल पश्चाताप, वाचा कारण‘बँक आपल्या दारी’ या योजनेअंतर्गत बँकिंग सेवांसोबतच विमा आणि चलन सेवाही दिली जाणार आहे. अशी सेवा देणाऱ्या बँकांच्या शाखांना त्यांच्या वेबसाइटवर पूर्ण माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आलं आहे.