जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बँकेतील काम लवकरात लवकर उरका, कोरोनामुळे कामकाजाची वेळ घटवण्याची शक्यता

बँकेतील काम लवकरात लवकर उरका, कोरोनामुळे कामकाजाची वेळ घटवण्याची शक्यता

बँकेतील काम लवकरात लवकर उरका, कोरोनामुळे कामकाजाची वेळ घटवण्याची शक्यता

CNBC आवाज’ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच बँकांच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात येणार आहे म्हणजेच सामान्यांसाठी बँकेची वेळ कमी करण्यात येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 मार्च : कोरोना व्हायरसमुळे देशातील अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होत आहे. देशातील अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे. कोलमडणारी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आणि देशातील कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून लवकरच मोठी पावलं उचलली जाणार आहेत. ‘CNBC आवाज’ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच बँकांच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात येणार आहे म्हणजेच सामान्यांसाठी बँकेची वेळ कमी करण्यात येणार आहे. (हे वाचा- कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय धोक्यात! या समूहाचे 10 हजार कर्मचारी बिनपगारी रजेवर) त्याचप्रमाणे कोरोनामुळे प्रभावित क्षेत्रांसाठी NPA चे नियम व अटी शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. याकरता 30 ते 60 दिवसांचा कालावधी वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया  आणि  सरकारमध्ये चर्चा सुरु आहे. (हे वाचा- कोरोनाचा खरा फटका असा बसणार! या कर्मचाऱ्यांचे पगार कमी होण्याचा धोका ) अर्थ मंत्रालयाने बँकांना Business Continuity Plan बनवण्यास सांगितले आहे. अधिक महत्त्वाच्या कामांसाठी बँकांची वेगवेगळी टीम बनवण्यात येऊ शकते. कामकाजाची वेळ मुख्यत: कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे NPA मध्ये शिथिलता मिळण्याबाबत अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग डिपार्टमेंटने प्रस्ताव मांडला आहे. अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालय यांच्यामध्ये या निर्णयाबाबत एकमत झाले आहे. सुरूवातीला MSME, ऑटो, टूर अँड ट्रॅव्हल्स, हॉटेल्स आणि एव्हिएशन सेक्टर्सचा विचार करण्यात येणार आहे. (हे वाचा- कोरोनासाठी देशातील पहिली इन्शुरन्स योजना लाँच, 499 रुपयात होणार उपचार ) NPA चा कालावधी वाढवण्यात येणार आहे, कारण पेमेंट करण्यास अनेक कंपन्यांकडून उशीर होत आहे. इंडियन बँकिंग असोसिएशन सुद्धा NPA साठी कालावधी वाढवण्याच्या बाजुने आहे. सरकारकडून कठोर पावलं उचलण्यास सुरूवात Coronavirus चा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 22 मार्चपासून पुढच्या एक आठवड्यासाठी भारतात एकही प्रवासी विमान दाखल होणार नाही, असं पत्रसूचना कार्यालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात