मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोरोनाचा खरा फटका असा बसणार! या कर्मचाऱ्यांचे पगार कमी होण्याचा धोका

कोरोनाचा खरा फटका असा बसणार! या कर्मचाऱ्यांचे पगार कमी होण्याचा धोका

कोरोना व्हायरसचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वांनाच बसला आहे. देशातील महत्त्वाच्या काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवले आहे तर काही कंपन्यांनी त्यांचे पगार कापण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 19 मार्च : कोरोना व्हायरसचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सर्वांनाच बसला आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना Work From Home करण्याचा सल्ला दिला आहे, पण काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या बिनपगारी रजेवर पाठवले आहे.  तर काही कर्मचाऱ्यांचे पगार कमी करण्यात येणार आहे. दरम्यान कोरोना व्हायरसचा (Coronavirus) मोठा फटका जगभरातील एअरलाइन्सना बसला आहे. इंडिगोचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी घोषणा केली आहे की, इंडिगोच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दत्ता यांच्या स्वत:च्या पगारातही 25 टक्के कपात करण्यात आली आहे. IndiGo Airline चं कोव्हिड-19 (COVID-19) च्या संक्रमणामुळे न भरून निघणारे नुकसान झाले आहे, त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावं लागत आहेत. (हे वाचा- कोरोनासाठी देशातील पहिली इन्शुरन्स योजना लाँच, 499 रुपयात होणार उपचार) जगभरातील इतर एअरलाइन्सची सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही आहे. एअर इंडियासुद्धा त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 5 टक्क्यांची कपात करत आहे. ही कपात एअरलाइनमध्ये काम करणाऱ्या सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार आहे. एअर इंडिया ही एअरलाइन आधीच तोट्यामध्ये आहे. परिणामी त्यांनी त्यांच्या केबिन क्रूचा फ्लायिंग अलाऊन्स अगोदरच कमी केला आहे, तसंच वैमानिकांचा मनोरंजन भत्ता देखील एअर इंडियाने रद्द केला आहे. अशातच जर पगारात देखील कपात होणार असेल तर कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे. (हे वाचा-रेल्वेने रद्द केल्या 500 हून अधिक गाड्या,गाड्यांची उपलब्धता तपासूनच घराबाहेर पडा) GoAirची आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद कोरोनाव्हायरसमुळे GoAir ने मंगळवारपासून आपली आंतरराष्ट्रीय उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा केली आहे. उड्डाणांची संख्या कमी झाल्यामुळे काही कालावधीनंतर कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना पगाराच्या रजेवर पाठवेल. मात्र कंपनी कर्मचार्‍यांच्या पगाराच्या हप्त्यात 20 टक्के कपात करण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जगभरातील जवळपास सर्व देशांनी पर्यटन आणि प्रवासावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे एअरलाइन कंपन्या सर्वात मोठा तोटा सहन करत आहेत. अनेक भारतीय एअरलाइन्सनी त्यांच्या आंतरराष्ट्रील फ्लाइट्स रद्द केल्या आहेत, तर डोमेस्टिक फ्लाइट्स देखील कमी केल्या आहेत. बेरोजगारी वाढण्याची शक्यता त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्रांच्या एका एजन्सीच्या अहवालानुसार जगभरातील 25 दशलक्ष लोकांच्या नोकऱ्या कोरोनामुळे धोक्यात आल्या आहेत. प्रत्येक देशांच्या सरकारने योग्य पॉलिसी नाही राबवली तर संपूर्ण जगात बेरोजगारीचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
First published:

पुढील बातम्या