मराठी बातम्या /बातम्या /मनी /Bank Strike : आताच करुन घ्या तुमची कामं कारण 4 दिवस बँक राहणार बंद?

Bank Strike : आताच करुन घ्या तुमची कामं कारण 4 दिवस बँक राहणार बंद?

Bank Strike

Bank Strike

4 दिवस बँक राहणार बंद राहण्याची शक्यता, त्यामुळे ATM मध्ये देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आधीच पैसे काढून ठेवण्याची तरतूद करा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: तुम्हाला जर बँकेत जाऊन काही कामं करायची असतील तर तुम्ही आताचपासूनच करायला सुरुवात करा. याचं कारण म्हणजे महिन्याअखेरीस बँका 4 दिवस बंद असणार आहेत. त्यामुळे तुमची कामं अडू शकतात. यावेळी ATM मध्ये देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आधीच पैसे काढून ठेवण्याची तरतूद करा.

तुम्हालाही या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करायची असतील तर तुम्ही तुमचा प्लॅन बदला. कारण महिन्याच्या अखेरीस बँक कर्मचाऱ्यांनी बँक संपाची घोषणा केली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) या बँक संघटनांच्या संघटनेने संपाची हाक दिली आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या यूएफबीयूच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

30 आणि 31 जानेवारीला संप झाला तर सलग चार दिवस बँका बंद राहतील. कारण 28 जानेवारीला चौथा शनिवार असून 29 जानेवारीला रविवार असल्याने साप्ताहिक सुट्टी आहे. 30 आणि 31 जानेवारीरोजी संपामुळे बँका बंद राहण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे 4 दिवसांनंतर 1 फेब्रुवारीला बँका उघडतील.

बँक खात्याचे नियम बदलले, RBI ने दिली माहिती समजून घ्या नाहीतर होईल नुकसान

 सलग 4 दिवस बँक बंद असल्याने ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. एटीएममध्ये कॅश संपणे, चेक क्लीअर न होणं अशा काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहेत. या कालावधीमध्ये इंटरनेट बँकिंग सुरू असेल. त्यामुळे तुमची छोटी कामं त्यावरून होऊ शकतात.

बँक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या काही मागण्या मान्य करण्याचे आवाहन करत आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी कर्मचारी आता ३० जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपावर जात आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनच्या (एआयबीईए) एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, बँक कर्मचारी 30 आणि 31 जानेवारीरोजी संपावर जातील.

ही सुवर्णसंधी सोडू नका! बँकेत नोकरी शोधताय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

एआयबीईएने आपल्या मागण्या इंडियन बँक्स असोसिएशनला (आयबीए) पत्राद्वारे पाठविल्या आहेत. बँक असोसिएशनकडून यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. आता आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे संपाचा मार्ग आहे. एआयबीईएचे सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम म्हणाले की, बँक कर्मचाऱ्यांच्या पाच मागण्या आहेत.

बँकिंगचे काम 5 दिवस असावे थोडक्यात 5 डे विक करावा, अशी बँक संघटनांची मागणी आहे. त्याचबरोबर पेन्शनही अद्ययावत करण्यात यावी. एनपीएस रद्द करावा, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. वेतनवाढीसाठीही चर्चा व्हायला हवी.

First published:

Tags: Bank holidays, Bank strike, Reserve bank of india