मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांना नेहमी आपलं खातं सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड बदलण्याच्या आणि योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देत असते. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी बँकेशी संबंधित नियम आणि इतर गोष्टींमध्ये बदल करत असते.
आरबीआयने बँक खात्यांशी संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. सेव्हिंग अकाउंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे सेव्हिंग अकाउंटशी संबंधित नियम बदलले आहेत. आरबीआयच्या नव्या सूचनांनुसार ज्या बँक खातेदारांनी आधीच आपले KYC डॉक्युमेंट सादर केले आहेत आणि त्यांच्या पत्त्यात कोणताही बदल झालेला नाही अशा लोकांना तपशील अपडेट करण्याची गरज नाही.
ही सुवर्णसंधी सोडू नका! बँकेत नोकरी शोधताय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी
काय आहे नवीन नियम
केवायसीच्या माहितीत कोणताही बदल झाला नाही तर खातेदाराला त्याचा एक ईमेल आयडी, रजिस्टर्ड मोबाइल नंबर, एटीएम किंवा अन्य डिजिटल माध्यमातून सेल्फ डिक्लेरेशन लेटर्स सादर करता येतील, असं RBI ने म्हटलं आहे.
केवायसीच्या माहितीत कोणताही बदल झाला नाही, तर पुन्हा केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकाचे सेल्फ डिक्लेरेशन पुरेस ठरणार आहे. बँक शाखांनी ग्राहकांना नोंदणीकृत ईमेल आयडी, नंबर, एटीएम इत्यादींद्वारे स्वयंघोषणा करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून त्यांना बँक शाखेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
या बँका FD वर देतात 7 टक्के व्याजदर, तुमची बँक आहे का लगेच चेक करा
आता खातेधारकाला त्याचे KYC अपडेट ऑनलाइन देखील करता येणार आहेत. ऑनलाइन बँकिंग सुरू केल्यानंतर तुम्हाला काही बँका पत्ता, फोन नंबर विचारतात. त्यावर तुम्ही पत्ता बदलला असेल तर अपडेट करता येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank services, Rbi, Rbi latest news