मराठी बातम्या /बातम्या /करिअर /ही सुवर्णसंधी सोडू नका! बँकेत नोकरी शोधताय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

ही सुवर्णसंधी सोडू नका! बँकेत नोकरी शोधताय? मग ही बातमी खास तुमच्यासाठी

बँक ऑफ महाराष्ट्र

बँक ऑफ महाराष्ट्र

तज्ज्ञांच्या मते, 2023 हे वर्ष बँकिंग क्षेत्रासाठी फार महत्त्वाचं असेल. या वर्षात बँकिंग क्षेत्रामध्ये आर्थिक उलाढालींसह नोकऱ्यांची संधीदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Maharashtra, India

  मुंबई,11 जानेवारी-  तज्ज्ञांच्या मते, 2023 हे वर्ष बँकिंग क्षेत्रासाठी फार महत्त्वाचं असेल. या वर्षात बँकिंग क्षेत्रामध्ये आर्थिक उलाढालींसह नोकऱ्यांची संधीदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. देशातील विविध बँकांमध्ये ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट तरुणांसाठी नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बँकेतील नोकरीमध्ये चांगला पगार मिळतो त्यामुळे अनेक तरूण या क्षेत्राकडे वळत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रनं तरुणांना चांगली नोकरी मिळवण्याची संधी देऊ केली आहे. वर्षातील पहिल्याच महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्रनं कर्मचारी भरती सुरू केली आहे. बँकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

  बँक ऑफ महाराष्ट्र ही भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची आणि मोठी बँक आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी बँकेच्या एकूण व्यवसायाने तीन लाख 15 हजार 620 लाख कोटींचा टप्पा ओलांडला होता. पुणे येथे मुख्यालय असलेल्या या बँकेच्या, मार्च 2022 पर्यंत 2022 शाखा होत्या. त्यानंतर त्यात वाढही झाली असेल. देशभरातील या शाखांमध्ये 29 दशलक्ष ग्राहक होते. या ग्राहकांना सेवा देण्यासाठी बँकेला मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी सध्या तीन पदांसाठी कर्मचारी भरती सुरू झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रनं चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (सीटीओ), कोलॅटरलाईज डेट ऑब्लिगेशन (सीडीओ) आणि चीफ रिस्क ऑफिसर (सीआरओ) पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

  (हे वाचा:ही सुवर्णसंधी सोडू नका; अर्जासाठी अवघे काही दिवस शिल्लक; रेल्वेत 10वी पाससाठी बंपर भरती )

  बँकेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भात एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटनुसार वरील पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जानेवारी 2023 आहे. 12 जानेवारीनंतर अर्ज प्रक्रिया बंद होईल. जे उमेदवार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्यास इच्छुक आहेत, ते या संधीचा फायदा घेऊ शकतात. याबाबत सविस्तर माहिती बँकेच्या bankofmaharashtra.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

  बँक ऑफ महाराष्ट्रची स्थापना व्ही.जी.काळे आणि डी.के.साठे यांनी पुणे येथे केली होती. 1 दशलक्ष यूएस डॉलर्सच्या अधिकृत भांडवलासह 16 सप्टेंबर 1935 रोजी बँकेची अधिकृत नोंदणी झाली. 8 फेब्रुवारी 1936 रोजी ही बँक कार्यरत झाली होती. या बँकेच्या माध्यमातून छोट्या उद्योगांना आर्थिक पाठबळ मिळालं आणि अनेक औद्योगिक घराण्यांच्या विकासाला चालना मिळाली. 1969 मध्ये बँकेचं राष्ट्रीयीकरण झालं. या बँकेचं मुख्यालय पुण्यात विद्यापीठ रस्त्यावर असून त्याचं नाव लोकमंगल आहे. तुम्ही या राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करण्यास उत्सुक असाल तर लगेच माहिती घेऊन अर्ज करा.

  First published:

  Tags: Bank Of Maharashtra, Career