Home /News /money /

या बँकांमध्ये बचत खाते उघडल्यास अधिक फायदा, मिळेल 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर

या बँकांमध्ये बचत खाते उघडल्यास अधिक फायदा, मिळेल 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर

बँकांमध्ये मिळणारे कमी व्याजदर ही सध्या सामान्यांसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र या काळात अशाही काही बँका आहेत ज्यामध्ये असणाऱ्या बचत खात्यावर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो आहे.

    नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : बँकांमध्ये मिळणारे कमी व्याजदर ही सध्या सामान्यांसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. मात्र या काळात अशाही काही बँका आहेत ज्यामध्ये असणाऱ्या बचत खात्यावर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळतो आहे. बँकांमध्ये बचत खात्याच्या माध्यमातून पगार, गुंतवणूक आणि कर्जावरील EMI यांसारखे व्यवहार केले जातात. त्यामुळे बचत खात्यात ठेवण्यात येणाऱ्या व्याजासंदर्भात देखील तुम्ही विचार करणे आवश्यक आहे. आरबीआयने व्याजदर कमी केल्यानंतर बँकांनी देखील त्यांचे व्याजदर कमी केले आहेत. आयडीएफसी बँक (IDFC Bank), बंधन बँक (Bandhan Bank) आणि इंडसइंड बँक बचत खात्यावर 7 टक्क्यापर्यंत व्याज देत आहेत. साधारणपणे बचत खात्यावर एका नॉमिनल दराने व्याज मिळते. मात्र काही बँका अन्य कमर्शिअल बँकांच्या तुलनेत चांगले व्याज देत आहेत. यामध्ये काही बँका छोट्या स्तरावरील आहेत तर काही नवीन आहेत. (हे वाचा-SBI ने 42 कोटी ग्राहकांसाठी सुरू केली ATM मधून पैसे काढण्याची नवीन सुविधा) BankBazaar नुसार 10 पैकी 8 छोट्या आणि खाजगी बँका बचत खात्यावर चांगले व्याज देत आहेत. अन्य दोन बँका स्मॉल फायनान्स बँक आहेत. नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या बँकांनी व्याजदर कमी ठेवले आहेत. आयडीएफसी बँक त्यांच्या ग्राहकांना बचत खात्यावर 6 ते 7 टक्के व्याज देत आहे. या बँकेमध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्याला सरासरी 10 हजार रुपये मेंटेन करणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणारी आरबीएल बँक 4.75 ते 6.75 टक्के दराने बचत खात्यावर व्याज देते. या बँकेतील खात्यामध्ये कमीतकमी रक्कम  (Average Minimum Balance) 500 रुपये ते 2500 रुपयांपर्यंत आहे. त्यानंतर बंधन बँक 4 ते 7.15 टक्के दराने व्याज देते. यामध्ये मिनिमम बॅलेन्सची रक्कम 5000 रुपये आहे. (हे वाचा-इंटरनेटशिवाय करू शकाल मोबाइल किंवा कार्ड पेमेंट, RBI ने केली ही घोषणा) यानंतर इंडसइंड बँक आहे, जी 4 ते 6 टक्के दराने व्याज देते. या यादीमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक अनुक्रमे 4 ते 7 टक्के आणि 4 ते 6.5 टक्के दराने व्याज देते. यानंतर येस बँक आहे जी 4 ते 6 टक्के दराने बचत खात्यावर व्याज देते. यामध्ये कमीतकमी शिल्लकची मर्यादा 10000 रुपये आहे. या यादीमध्ये असणारी लक्ष्मी विलास बँक 3.25 टक्के ते 5.75 टक्के व्याज देत आहेत. या बँकेत 500-1,000 रुपये मिनिमम बॅलेन्स असणे आवश्यक आहे. या तुलनेत सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टरमधील जवळपास सर्व बँकाचे बचत खात्यावरील व्याजदर खूप कमी आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा अनुक्रमे 2.75 टक्के आणि 2.75 ते 3 टक्के व्याजदर देतात. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँका 3 ते 3.35 टक्के दराने व्याज देत आहेत. Axis बँकेच्या ग्राहकाला बचत खात्यावर 3 ते 4 टक्के व्याज मिळते आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Saving account

    पुढील बातम्या