मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अनेक सोयीसुविधा आहेत. बऱ्याचदा त्या आपल्याला माहिती नसतात. तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी उत्तम सेव्हिंग करण्याचा पर्याय शोधत असाल तर ही बँक ऑफ महाराष्ट्रची युवा योजना सर्वोत्तम आहे. तुम्ही तुमच्या मुलांना देखील हे खातं सुरू करुन देऊ शकता. मुलांचा विकास होण्यासाठी त्यांना बँकिंग ची उत्तम आणि योग्य पद्धतीनं सवय व्हावी आणि त्यांना भविष्यातील ग्राहक बनवण्याच्या दृष्टीकोनातून, मुले / विद्यार्थ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रने ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे मुलांमध्ये बँकिंगचं ज्ञान विकसित होईल. आपल्या पैशांचा योग्य वापर कसा करायचा हे त्यांचे पालक त्यांना या खात्याच्या माध्यमातून शिकवू शकतील असाही उद्देश आहे. वयोमर्यादा: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये युवा योजनेंतर्गत 10 वर्ष आणि 18 वर्ष वयोगटातील युवकांचं खातं सुरू करता येतं. या योजनेला महाबँक युवा योजना असंही म्हटलं जातं. खातं उघडताना आधारकार्ड, पालकांची काही महत्त्वपूर्ण कागदरपत्र बँकेत जमा करणं आवश्यक आहे. या योजनेंतर्गत बचत / आवर्ती /मुदत ठेव अशी तीन खातं उघडता येतात. बचत ठेवी: फक्त रु. १०/- ठेवी स्वीकारून खाते मुलाच्या नावावर सुरू केलं जातं. त्याच्या / तिच्याकडून चालविले जाणारे खाते. प्रत्येक खात्यावर ठराविक रक्कम शिल्लक रहावी यासाठी नियम आहेत. मात्र या खात्यासाठी रक्कम शिल्लक राहिली नाही तरी चालू शकतं. कोणताही दंड आकारला जाणार नाही. तसेच चेकबुकही दिले जाणार नाही. 18 वर्षांनंतर जर चेकबुक आवश्यक असेल तर त्यासाठी बँक वेगळं शुल्क आकारेल.
बँक ऑफ महाराष्ट्रचे हे सिक्रेट डेबिट कार्ड माहिती आहेत का?आवर्ती ठेव: विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शालेय शुल्क आणि इतर खर्च सहजपणे करता येतील अशा पध्दतीने योग्य तसे मासिक हप्ते निर्धारित केले जातील. टीडीएस लागू होत नाही. मुदत ठेव/रोख प्रमाणपत्र: निर्धारित कालावधीच्या शेवटी रु. 50000 किंवा रु. 100000 मिळवण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला किंवा वाढदिवशी किंवा प्रत्येक वर्षी रोख प्रमाणपत्र म्हणून योग्य ती रक्कम जमा करणे आहे. इतर लाभ: विविध अभ्यासक्रम शुल्क, शैक्षणिक शुल्क, वसतीगृह शुल्क इत्यादीसाठी शहरांतर्गत तत्वावर ठेव योजनेअन्वये पालकांच्या खात्यातून रकमा या खात्यात जमा होऊ शकतात. पालकांच्या खात्यातून त्याच शाखेतील खात्यात रकमा जमा करण्यासाठी विनाशुल्क स्थायी स्वरुपाच्या सूचना देता येतात. निश्चित अशा खर्चाच्या मर्यादेसह विनाशुल्क एटीएम डेबिट कार्ड. शक्य तिथं मोबाईल फोनसारख्या सुविधांच्या बिलांच्या रकमा भरण्याच्या विनाशुल्क सेवेची सुविधा.
बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांसाठी आणलीय ‘महा कॉम्बो लोन स्कीम’कर्जांच्या संबंधी: सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ खातेधारक असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना (व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतेवेळी) योग्य त्या वेळी शैक्षणिक कर्ज मंजूर केले जाते.