मुंबई : आपल्याला फक्त ATM कार्ड माहिती असंत, पण डेबिट कार्डचेही प्रकार असतात आणि त्याचे फायदेही असतात. ते आपण एवढे कधी पाहात नाही. महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्राची ओळख आहे. बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यानुसार वेगवेगळे क्रेडिट कार्ड देतं जाणून घेऊयात. बँक ऑफ महाराष्ट्रने दिलेल्या माहितीनुसार रुपे क्लासिक कार्ड, रुपे प्लॅटिनम कार्ड, किसान कार्ड, मुद्रा कार्डस्, स्टुडंट डीबीटी प्रीपेड-कार्डस् (क्लोज्ड लूप कार्डस्), व्हिसा क्लासिक कार्ड, व्हिसा पर्पल कार्ड, रूपये पीएमजेडीवाय कार्ड्स असे वेगवेगळी कार्ड आहेत. यापैकी तुम्ही कोणतं कार्ड घेऊ शकता आणि त्याचा फायदा काय तेही सांगितलं आहे. रुपे क्लासिक कार्ड हे कार्ड सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे. सेव्हिंग अकाउंट घडणाऱ्या प्रत्येकाला हे कार्ड मिळतं. या कार्डद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. ATM मधून पैसे काढू शकता. तुम्ही व्यवहार करू शकता. बँकेत शिल्लक असणाऱ्या रकमेवर तुम्हाला व्यवहार करता येतात, त्यासाठी हे कार्ड वापरलं जातं. रुपे प्लॅटिनम कार्ड नव्या आणि आधीच्या ग्राहकांसाठी ज्या ग्राहकाने त्याच्या खात्यात तिमाही सरासरी १० हजार रुपये किंवा जास्त रक्कम ठेवली आहे त्यांना हे कार्ड दिलं जातं. कार्ड बँकेच्या कर्मचाऱ्यांना तो/ती सेवेमध्ये असेपर्यंत विनामूल्य आहे. कार्ड एटीएम्सवर, पीओएस व्यवहार आणि अन्य ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरता येईल. रुपे प्लॅटिनम डेबिट कार्डची अनेक अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत. मर्चंट डिस्काऊंट रेट (एमडीआर) हा सर्वसाधारण डेबिट कार्डपेक्षा ०.१५% अधिक आहे; ज्यायोगे बँकेस अंतर्गत व्यवहारांमध्ये रुपे डेबिट कार्डच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी प्राप्त होईल. हे कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना अपघाती (मृत्यू) विमा 2 लाख रुपयांपर्यंत दिला जातो. काही केसमध्ये हा विमा १० लाखापर्यंतही असू शकतो. किसान कार्ड रुपे किसान कार्ड सर्व सर्वसाधारण एमकेसीसी खात्यांना मिळू शकतं. यावर शेतकऱ्यांना फायदा मिळतो. शेतकऱ्यांना या कार्डद्वारे वेगवेगळ्या सुविधांचा लाभही घेता येऊ शकतो.
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सुकन्या योजनेसाठी कसं सुरू करायचं Account?मुद्रा कार्डस् मुद्रा कार्डस् ही वैयक्तिक स्वरूपाची डेबिट कार्डस् असून ती सर्व पात्र पीएमएमवाय (प्रधानमंत्री मुद्रा योजना) लाभधारकांना जारी करण्यात येतात. स्टुडंट डीबीटी प्रीपेड-कार्डस् ही प्रीपेड कार्डस् अशा कार्डस्मध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेच्या बदल्यात वस्तूंची खरेदी करण्यासाठी जारी करण्यात येतात. सध्या बँकेने अशी प्रीपेड कार्डस् पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) आणि नागपूर महानगरपालिकेच्या डीबीटी प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना जारी केली आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांसाठी आणलीय ‘महा कॉम्बो लोन स्कीम’व्हिसा क्लासिक कार्ड खात्यामध्ये रक्कम शिल्लक रकमेच्या आधारे तुम्ही या कार्डद्वारे वेगवेगळ्या सुविधांचा ATM च्या मदतीने फायदा घेऊ शकता.
व्हिसा पर्पल कार्ड सदरची कार्डस् महाबँक पर्पल सेव्हिंग खातेधारकांना प्रत्येक दिवशी कमाल व्यवहार मर्यादा (रु. १००,००० = एटीएम आणि पीओएस) या अंतर्गत देण्यात येतात. कोणत्याही प्रकारचा देखभाल खर्च नाही आणि कोणत्याही एटीएमवर अमर्यादित व्यवहाराची मुभा आहे.