मुंबई : मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी सरकारने सुकन्या समृद्धी योजना आणली आहे. ही योजना 2014 पासून देशभरात लागू करण्यात आली आहे. मुलींच्या शिक्षणाचा खर्च असो किंवा लग्नाचा हे पैसे तिच्या वयाच्या 18 वर्षांनंतर मुलीला मिळणार आहेत. पालकांनी आपल्या मुलीची तरतूद या योजनेंतर्गत करावी यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. सुकन्या समृद्धि योजना बँक ऑफ महाराष्ट्रा बँकेत 02 डिसेंबर 2014 पासून लागू करण्यात आली. बँक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व शाखांमध्ये खाते उघडता येते. मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. खाते कोण उघडू शकते? बँक ऑफ महाराष्ट्रने दिलेल्या माहितीनुसार नैसर्गिक / कायदेशीर पालक मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांचे होईपर्यंत मुलीच्या नावे खाते उघडू शकतात. त्यानंतर खातं उघडता येणार नाही. ज्या पालकांना दोन मुली किंवा तीनपर्यंत जुळ्या मुलींचा दुसरा जन्म किंवा पहिल्या जन्माचा परिणाम तीन मुलींमध्ये होतो. असे पालकही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. Investment Tips: मंदीत संधी! ‘या’ तीन प्रकारे करा गुंतवणूक, होणार नाही आर्थिक नुकसान तिसरी मुलगी असणाऱ्यांना मात्र सुकन्या योजनेचा लाभ घेता येत नाही. खरं सांगायचं तर ही सर्वात उत्तम योजना आहे. यामध्ये तुम्ही अगदी कमी रकमेपासूनही सुरुवात करू शकता. तुमच्या मुलीचं भविष्य तुम्ही सुरक्षित करू शकता. त्यासाठी तुम्हाला बँकेत किती शुल्क जमा करायचं आहे त्याची मर्यादाही देण्यात आली आहे. खातं उघडताना तुम्हाला सुरुवातीला 100 रुपये भरावे लागणार आहत. त्यानंतर तुम्ही 250 रुपयांपासून सुरुवात करू शकता. तुम्ही वर्षाला 150000 रुपयांपर्यंत रक्कम भरू शकता. याची मुदत पालकांना वाढवताही येऊ शकते. खातं उघडल्यापासून 21 वर्षांपर्यंत या खात्यावर पैसे ठेवता येतात. त्यानंतर मात्र हे पैसे तुम्ही फॉर्मवर लिहिल्या प्रमाणे एकतर तुमच्या खात्यात जमा होतात किंवा तुम्हाला घेऊन जावे लागतात.
पीपीएफ का सुकन्या समृद्धी? मुलींच्या भविष्यासाठी बेस्ट योजना कोणती?या योजनेत किमात खातं उघडल्यापासून तुम्हाला 15 वर्ष पैसे गुंतवायचे आहेत. जास्तीत जास्त तुम्हाला 21 वर्षांपर्यंत हे खातं सुरू ठेवता येतं. तिमाही आधारावर भारत सरकार व्याज दर जाहीर करते. या योजनेत आयटी कायदा 1961 च्या कलम 80 सी अंतर्गत लागू आहे. ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास किंवा जीवघेणा रोगांना वैद्यकीय सहाय्य करणे यासारख्या अत्यंत दयाळू कारणास्तव, केंद्र सरकारच्या आदेशाने अधिकृत केले जाण्याची परवानगी आहे. जर तुम्ही खात्यात पैसे भरायचे विसरलात तर तुम्हीला किमान 50 रुपये दंड भरावा लागणार आहे. तुम्ही रोख पैसे, चेक आणि डिमांड ड्राफ्ट यासारख्या सुविधांचा आधार घेऊन तुम्ही पैसे भरू शकता.
मागील शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस खात्यात बाकी असलेली 50% शिल्लक उच्च शिक्षणाच्या उद्देशाने, वयाच्या 18 वर्षानंतर विवाहाच्या उद्देशानं काढता येऊ शकतात. मात्र या व्यतिरिक्त तुम्हाला खात्यातून रक्कम काढता येणार नाही.