मुंबई : बऱ्याचदा आपल्याला एकवेळी दोन गोष्टी घ्यायच्या असतात. पण पैशांची अडचण असल्याने त्या घेता येत नाही. ग्राहकांची हीच गरज ओळखून बँक ऑफ महाराष्ट्रने एक उत्तम योजना आणली आहे. प्रत्येक कुटुंबाला आता त्यांचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे. ही योजना एवढी सुंदर आहे की एकावेळी तुम्ही दोन गोष्टींसाठी लोन घेता येतं. ही योजना नेमकी काय त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात या सगळ्याबद्दल जाणून घेऊया. काय आहे ही योजना? बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार घर आणि वाहन एकत्रित खरेदी करण्यासाठी महा कॉम्बो कर्ज योजना आहे. ज्यांना या दोन्ही गोष्टी एकत्र घ्यायच्या असतील तर ते यासाठी कॉम्बो लोन काढू शकतात. नवीन किंवा विद्यमान घर/ फ्लॅट बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी आणि विद्यमान घर/ फ्लॅट रिनोवेट करणं इत्यादीसाठी हे कर्ज मिळणार आहे. तर यासोबत गाडी घेण्याचं स्वप्नही पूर्ण करता येणार आहे. वैयक्तिक व वापरासाठी नवीन चार चाकी वाहन अर्थात कार, जीप, एसयूव्ही इ. खरेदीसाठी वाहन कर्ज बँक देणार आहे. स्वत:चं घर आणि गाडी असावी या उद्देशानं ही योजना आणण्यात आली आहे.
तुमच्या खिशातील ही 500ची नोट खरी आहे की खोटी? ओळखण्यासाठी वापरा ही सोपी ट्रिककोणाला घेता येणार या योजनेचा लाभ? सध्याच्या वर्षातील केंद्र / राज्य सरकार, पीएसयू, प्रतिष्ठित कंपन्या यापैकी एका वर्षात जे कायमस्वरुपी कर्मचारी आहेत त्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. पगारदारांना एक वर्षांचं उत्पन्न आणि खर्च तर व्यावसायिकांना गेल्या वर्षांतील उत्पन्न दाखवावं लागेल. अर्ज दाखल करताना अर्जदाराचेचे वय 21 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत यासाठी अर्ज करता येऊ शकतो. वेतनदारांसाठी एकूण महिनाच्या पगाराच्या 60 पट / निव्वळ मासिक वेतन 75 पट असणं आवश्यक असल्याचं बँकेनं म्हटलं आहे.
कार विकण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी, अन्यथा येईल पश्चातापाची वेळमहिलांनी यासाठी अर्ज केला तर त्यांना कोणतंही शुल्क आकारण्यात येणार नाही. कॉम्बो कर्जासाठी किमान 25 हजार कमाल रक्कम भरणं आवश्यक आहे. ज्यांचा सिबिस स्कोअर ७०० पेक्षा जास्त चांगला आहे, त्यांना 8 टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.