नवी दिल्ली, 2 एप्रिल: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स म्हणजेच MCLR मध्ये 10-40 बेसिस पॉइंट्सनी वाढ केली आहे. नवीन व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहेत. MCLR वाढल्याने कर्जावरील व्याजदर वाढला आहे. MCLR वाढल्यामुळे कार लोन, होम लोन, पर्सनल लोन यांसारख्या सर्व प्रकारच्या कर्जाचा EMI वाढलाय. याचा परिणाम जुन्या आणि नवीन कर्जदारांवर झाला आहे. बँकेने रेपो लिंक्ड इंटरेस्ट रेट म्हणजेच RPLR मध्ये बदल करण्याचा निर्णयही घेतलाय. रेपो लिंक्ड रेटसाठी मार्क-अप रेट 10 बेसिस पॉईंटने कमी करण्यात आलाय. यामुळे नेट RPLR खाली आला आहे. हा दर 1 एप्रिल 2023 पासून देखील लागू आहे.
BSE सोबत शेअर केलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ इंडियाने रातोरात MCLR 40 बेस पॉईंटने वाढवला आहे. तो 7.50 टक्क्यांवरून 7.90 टक्के करण्यात आलाय. एका महिन्याच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्समध्ये 15 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. तो आता 7.95 टक्क्यांवरून 8.10 टक्के झालाय. एमसीएलआरमध्ये तीन महिन्यांसाठी 20 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. तो 8 टक्क्यांवरून 8.20 टक्के झाला आहे.
3 महिन्यात सोन्याने दिले FD पेक्षा जास्त रिटर्न, आता काय असेल भाव? एक्सपर्ट सांगतात...
त्याचप्रमाणे, सहा महिन्यांच्या MCLR दरात 15 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. तो आता 8.25 टक्क्यांवरून 8.40 टक्क्यांवर पोहोचला आहे. मार्जिनल कॉस्ट रेटमध्ये 1 वर्षासाठी 10 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. तो 8.50 टक्क्यांवरून 8.60 टक्के झाला आहे. 3 वर्षांसाठीचा MCLR रेट देखील 10 बेसिस पॉईंटने वाढवण्यात आला आहे. तो 8.70 टक्क्यांवरून 8.80 टक्के झालाय.
SBI यूझर्सना मोठा धक्का! क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांमध्ये बदल, आता...
बँक ऑफ इंडियाने रेपो बेस्ड लेंडिंग रेट्स म्हणजेच RBLR साठी मार्क-अपमध्ये 10 बेसिस पॉइंट्सनी कमी केला आहे . तो 2.85 टक्क्यांवरून 2.75 टक्के करण्यात आला आहे. सध्या रेपो दर 6.50 टक्के आहे. या मार्क-अप दरासह, निव्वळ RPLR 9.25 टक्के होतो. पूर्वी तो 9.35 टक्के होता. RPLR मधील बदल 1 एप्रिलपासून लागू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank details