मराठी बातम्या /बातम्या /मनी /SBI यूझर्सना मोठा धक्का! क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांमध्ये बदल, आता...

SBI यूझर्सना मोठा धक्का! क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांमध्ये बदल, आता...

एसबीआय क्रेडिट कार्ड

एसबीआय क्रेडिट कार्ड

तुम्ही एसबीआय क्रेडिट कार्ड यूझर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आता यामधून मिळणाऱ्या सुविधांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 2 एप्रिल: सध्याच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. जर तुम्ही कॅशबॅक एसबीआय कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कॅशबॅक एसबीआय कार्डमध्ये मोठे डिव्हॅल्यूएशन होणार आहे. या क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या फायद्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल 1 मे 2023 पासून लागू होतील. यामुळे आता एसबीआय क्रेडिट कार्ड यूझर्सची चिंता वाढली आहे.

एसबीआय क्रेडिट कार्डमध्ये करण्यात आलेला सर्वात मोठा बदल म्हणजेच तुम्ही सर्व कॅटेगिरी मिळून एक महिना-बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त 5000 रुपयांच कॅशबॅक मिळेल. पहिले शॉपिंग कॅटेगिरीमध्ये जास्तीत जास्त 10 हजार कॅशबॅकची मर्यादा होता. तर काही कॅटेगिरीमध्ये 1 टक्के अनलिमिटेडट कॅशबॅक मिळायचा. या व्यक्तिरिक्त कॉम्प्लिमेंट्री एयरपोर्ट लाउंज अॅक्सेसची सुविधा आता मिळणार नाही. पहिले कार्ड होल्डरला दरवर्षी डोमेस्टिक एयरपोर्टच्या लाउंजमध्ये 4 वेळा मोफत थांबम्याची सुविधा दिला जात होती.

काय आहेत कार्डचे नवीन फिचर्स

-कोणत्याही व्यापारी निर्बंधांशिवाय कॅशबॅक SBI कार्ड ग्राहकांना कुठूनही ऑनलाइन खरेदीवर 5% कॅशबॅक मिळेल. याचा अर्थ असा की तुम्ही Amazon, Flipkart किंवा इतर कोणत्याही वेबसाइटवरून खरेदी केल्यास तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल.

-याशिवाय ऑफलाइन पेमेंट आणि युटिलिटी बिल पेमेंटवर तुम्हाला 1% कॅशबॅक दिला जाईल.

-रेंट पेमेंट, वॉलेट लोड, ईएमआय ट्रांझेक्शन, कॅश अॅडव्हान्स, बॅलन्स ट्रान्सफर, इनकॅश आणि फ्लेक्सिपे यावर कोणताही कॅशबॅक मिळणार नाही. नवीन बदलानंतर, आता इन्शुरन्स सर्व्हिस (MCC- 5960, 6300, 6381) युटिलिटी (MCC- 4814, 4900, 9399, 4816, 4899), ज्वेलरी (MCC- 5051, 5940, 59 40,7631) यासारख्या काही श्रेणींमध्ये कॅशबॅक उपलब्ध होणार नाही.

-पेट्रोल पंपांवर 500 ते 3000 रुपयांपर्यंतची इंधन खरेदीची पेमेंट या कार्डवरुन केल्यास 1% इंधन सरचार्ज भरावा लागणार नाही. एका बिलिंग सायकलमध्ये जास्तीत जास्त 100 रुपये सरचार्ज माफ केला जाऊ शकतो.

-हे कार्ड कॉन्टॅक्टलेस टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे, जे ग्राहकांना 'टॅप आणि पे' ची सुविधा देखील देते. म्हणजेच कार्ड स्वाइप न करता फक्त POS मशीनवर टॅप करून पेमेंट करता येते.

-हे कार्ड व्हिसा कार्ड स्वीकारणाऱ्या सर्व व्यापारी आउटलेट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते.

काय सांगता! आता नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेअर केला तर होईल तुरुंगवास, नवा नियम काय?

कॅशबॅक रिडीम करण्याची गरज नाही

कॅशबॅक एसबीआय कार्डमध्ये कॅशबॅक रिडीम करण्याची गरज नसते. या कार्डमध्ये ऑटो-क्रेडिट कॅशबॅक सुविधा उपलब्ध आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड खात्यात पुढील बिल जनरेशनच्या 2 दिवसांच्या आत कॅशबॅक मिळेल.

कॅशबॅक एसबीआय कार्डचे चार्जेस किती आहेत?

-या कार्डची जॉइनिंग फीस 999 रुपये आहे.

-या कार्डची रिन्यूअल फीस 999 रुपये आहे. वर्षभरात 2 लाख रुपये खर्च केल्यास रिन्यूअल फीस रिव्हर्स केली जाते.

First published:
top videos

    Tags: Credit card