नवी दिल्ली, 2 एप्रिल : अमेरिकेतील बँकिंग संकटाच्या बातम्यांनंतर जगभरातील शेअर बाजारात प्रचंड उलथापालथ झाली आहे. यामुळेच सोने पुन्हा गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित पर्याय ठरले. कारण सोन्याच्या किमतीत जबरदस्त वाढ झाली. आर्थिक मंदीच्या भीतीमुळे चालू वर्षाच्या (CY) 2023 च्या पहिल्या तिमाहीत परताव्याच्या बाबतीत सोन्याच्या किमतीने सर्व मालमत्ता वर्गापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान, MCX वर सोन्याचा भाव ₹54,975 ते ₹59,371 प्रति 10 ग्रॅम होता. मार्च 2023 च्या तिमाहीत सोन्याने सुमारे 8 टक्के परतावा दिलाय.
कमोडिटी बाजारच्या विशेषज्ञांनुसार, सोन्याच्या किंमतीत अजुनही तेजी आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीशी संबंधित महत्त्वाची पातळी मोडल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.
सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. याविषयी मार्केट एक्सपर्ट सुगंधा सचदेवा यांनी मिंटला सांगितले की, 'मार्चमध्ये सोन्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. सोनं हे या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मालमत्तांपैकी एक होते. जे जवळपास 8% वाढले. यूएस फेडची मवाळ भूमिका, महागाईशी संबंधित चिंता, जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीची चिंता आणि केंद्रीय बँकांकडून सोन्याची जोरदार खरेदी यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. अशा काळात सोने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
SBI यूझर्सना मोठा धक्का! क्रेडिट कार्डसंदर्भातील नियमांमध्ये बदल, आता...
कमोडिटी मोर्केटच्या एक्सपर्ट्सनुसार, सध्या एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीसाठी आता 60,600 मोठा रेजिस्टेंस आहे. तर आंतरराष्ट्रीय स्पॉट मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीला प्रति औंस 2,000 डॉलर या पातळीवर विरोध होत आहे. ही पातळी तुटल्यास सोन्याचा भाव आणखी वाढेल.
तर स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे सीनियर कमोडिटी रिसर्च अॅनालिस्ट निरपेंद्र यादव म्हणाले की, 'ज्या प्रमाणे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत दबाद आहे, गुंतवणूकदारांना आशा आहे की, फेड आता व्याजदरांमध्ये बढोतरीवर नरम होईल. तर कोविड-19 निर्बंधांमधून बाहेर पडल्यानंतर, चीनची अर्थव्यवस्था स्थिर वाढ दर्शवतेय, ज्यामुळे भौतिक सोन्याची मागणी वाढतेय.'
आयआयएफएल सिक्योरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट-रिसर्च, अनुज गुप्ता म्हणाले की, सोन्याच्या किमतीत वाढ होण्याच्या अपेक्षेने, अल्प ते मध्यम कालावधीत ते नवीन शिखरावर जाण्याची अपेक्षा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold prices today