• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • SBI च्या Saving Account मध्ये कमी पैसे असताना ATM मधून पैसे काढताना सांभाळून, Transaction फेल झालं तर होईल दंड

SBI च्या Saving Account मध्ये कमी पैसे असताना ATM मधून पैसे काढताना सांभाळून, Transaction फेल झालं तर होईल दंड

केवळ एसबीआयचं नव्हे तर देशातील अन्य बॅंकादेखील खात्यावर कमी बॅलन्स असेल आणि एटीएममधून पैसे काढताना ट्रान्झॅक्शन फेल झालं तर पेनल्टी वसूल करतात.

  • Share this:
नवी दिल्ली, 02 ऑगस्ट: स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सर्वांत मोठी बॅंक (Bank) आहे. सर्वाधिक ग्राहक संख्या असणारी एसबीआय ग्राहकांमध्ये अर्थिक जनजागृतीसाठी सातत्याने मार्गदर्शन करत असते. तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही एसबीआयचे ग्राहक असाल आणि एटीएम (ATM) मधून पैसे काढायचे असतील तर तुमच्या खात्यावर किती रक्कम शिल्लक आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे. तुम्ही असं केलं नाही तर आणि तसंच खात्यावर तुमच्या गरजेपेक्षा कमी रक्कम असेल आणि एटीएममध्ये जाऊन तुम्ही पैसे काढण्याचा प्रयत्न केला आणि ट्रान्झॅक्शन (Transaction) फेल झालं तर बॅंक तुमच्याकडून पेनल्टी (Penalty) किंवा दंड वसूल करु शकते. झी न्यूज हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं असून, जाणून घेऊया याविषयी सविस्तर... एसबीआयने सप्टेंबर 2020 मध्ये नियमात एक बदल केला होता. त्यानुसार, जर तुम्हाला एसबीआयच्या एटीएममधून 10 हजारांपेक्षा अधिक रक्कम काढायची असेल तर तुम्हाला केवळ पीन (Pin) टाकणं पुरेसं नसेल. बॅंकेत रजिस्टर केलेल्या मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी (OTP) देखील एटीएममध्ये नोंदवावा लागेल. तेव्हाच तुम्हाला रक्कम मिळेल. केवळ एसबीआयचं नव्हे तर देशातील अन्य बॅंकादेखील खात्यावर कमी बॅलन्स असेल आणि एटीएममधून पैसे काढताना  ट्रान्झॅक्शन फेल झालं तर पेनल्टी वसूल करतात. ही पेनल्टी रक्कम प्रत्येक फेल  ट्रान्झॅक्शनमागे 20 रुपये अधिक जीएसटी इतकी रक्कम असते. खरं तर हा नियम काही नवीन नाही. परंतु, पेनल्टी किंवा दंडाची रक्कम भरावी लागू नये, यासाठी तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी आपल्या सेव्हिंग अकाउंटकडे लक्ष देणं अत्यंत सोपं आहे. कारण यासाठी अनेक पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. एसएमएस (SMS) किंवा मिस्ड कॉलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अकाउंटवरील बॅलन्स रक्कम काढण्यापूर्वी जाणून घेऊ शकता. तसेच जर तुम्ही Online SBI सेवेचा वापर करत असाल तर ही माहिती तुम्हाला लगेच मिळू शकते. त्याशिवाय गुगल पे, फोन पे सारख्या अॅपवर देखील अकाउंटमधील बॅलन्स माहिती करुन घेता येऊ शकतो.

पुढील 48 तासांत PPF खात्यात पैसे जमा केल्यास मिळेल अधिक फायदा, अन्यथा होईल नुकसान

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट वरील माहितीनुसार, मेट्रो शहरातील नियमित बचत खाते धारकांना बॅंक एका महिन्यात 8 वेळा एटीएमव्दारे निशुल्क व्यवहार करण्यास परवानगी देते. यात 5 वेळा एसबीआयचे एटीएम आणि 3 वेळा अन्य बॅंकांच्या एटीएममधून केलेल्या व्यवहाराचा समावेश असतो. नॉन मेट्रो शहरात 10 वेळा एटीएमच्या माध्यमातून व्यवहार करणं निशुल्क असतं. यात 5 वेळा एसबीआय एटीएम आणि 5 वेळा अन्य बँकांच्या एटीएममधून केलेला व्यवहार समाविष्ट असतो.

Gold Price Today: सोने-चांदी दरात घसरण, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जर तुमचे एटीएम ट्रान्झॅक्शन फेल झाले आणि रक्कम मिळाली नाही तर घाबरुन जाण्याची गरज नाही. एटीएम मशीनमधून मिळालेली रिसीट तुम्ही जपून ठेवणं आवश्यक आहे. त्यानंतर यासंबंधी एसबीआय वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन (Online) तक्रार तुम्ही दाखल करु शकता. केवळ सात दिवसांत तुमच्या तक्रारीचं निवारण केलं जाईल.
Published by:Pooja Vichare
First published: